आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मार्ट सिटी: साडे 32 लाखांमध्ये नियुक्त केली नवीन एजन्सी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-  महापालिका क्षेत्राचा स्मार्ट सिटी प्रकल्प तयार करण्याकरीता प्राइस वॉटर हाऊस कूपर या नवीन एजन्सीची नियुक्ती करण्यात आली असून, ३२ लाख ५० हजार रुपये मोजून स्मार्ट सिटीचा प्रकल्प अहवाल तयार केला जाणार आहे.
 
मागील तीन वर्षांत विविध कंपन्यांकडून तयार करण्यात आलेले प्रकल्प अहवाल अपयशी ठरल्याने नव्याने सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने पुन्हा नव्याने प्रकल्प अहवाल तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. १२ सप्टेंबरला प्राप्त तीन निविदा उघडण्यात आल्या. १४ सप्टेंबरला आयुक्त हेमंत पवार यांच्याकडे तीन ही एजन्सीकडून स्मार्ट सिटी प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. निविदेतील तांत्रिक कागदपत्रांची तपासणी करण्यात आल्यानंतर एजन्सीची निवड करण्यात आली. प्राइस वॉटर हाऊस कूपर या एजन्सीकडून ३५ लाख ३८ हजार ८२० रुपयांचा प्रकल्प अहवाल प्रस्तावित केला होता, मात्र वाटाघाटी केल्यानंतर ३२ लाख ५० हजार रुपयांमध्ये हा कंत्राट निश्चित करण्यात आला.
बातम्या आणखी आहेत...