आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राज’कारण : अमरावती जि. प. च्या पहिल्याच सभेत भाजप काँग्रेसमध्ये ठिणगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पथ्रोटच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुद्द्यावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मार्गदर्शन मागण्यासाठी एकत्र आलेले विरोधी गटाचे सदस्य. - Divya Marathi
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत पथ्रोटच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुद्द्यावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मार्गदर्शन मागण्यासाठी एकत्र आलेले विरोधी गटाचे सदस्य.
अमरावती - जिल्हा परिषदेच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत पथ्रोटच्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुद्यावरून सत्ताधारी विरोधकांमध्ये वादाची ठिणगी पडली. उदभवलेल्या वादाच्या स्थितीत मागितलेल्या मार्गदर्शनावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मौन पाळल्यामुळे पुढील कामकाजच होऊ शकले नाही.
 
विरोधकांच्या निषेधाच्या तर सत्ताधाऱ्यांच्या विजयाच्या घोषणेत गोंधळ वाढल्यानंतर अध्यक्षांनी अर्ध्या तासातच सभा संपल्याचे जाहीर केले. दरम्यान, पहिल्याच सभेत विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये संघर्षाची ठिणगी पडल्यानंतर येणारा काळ सत्ताधाऱ्यांसाठी सोपा नसल्याचे या निमित्ताने गुरूवारी दिसून आले. 
 
नवीन पदाधिकाऱ्यांचे पदग्रहण, सभापती, विषय समितीच्या निवड प्रक्रियेचे सोपस्कार पार पडल्यानंतर नव्याने सत्तारुढ झालेल्या जिल्हा परिषदेच्या पहिल्यावाहिल्या सर्वसाधारण सभेचे गुरूवारी आयोजन करण्यात आले होते. दुपारी एक वाजता सुरू झालेल्या सभेत सचिवांनी विषय पत्रिकेवरील कामकाज सुरू केल्यानंतर यापुर्वीच्या सभेतील कामकाज कायम करण्याबाबत सभागृहाला सुचविले. त्यानुसार मागील सभेत पथ्रोट येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. मागील सभेत या आरोग्य केंद्राच्या बांधकामाचा विषय नामंजूर करून बांधकाम समितीच्या शिफारशीसह पुढील सभेत हा विषय ठेवण्याचा निर्णय सभागृहाने घेतला होता. दरम्यान गुरुवारी सत्ताधाऱ्यांनी हा विषय बहुमताने नामंजूर करण्यात येत असल्याचे सांगितले. यावर विरोधी पक्षातील रविंद्र मुंदे , प्रताप अभ्यंकर यांच्यासह इतर सदस्यांनी तीव्र आक्षेप घेऊन यावर चर्चा करण्याची मागणी केली. संबंधित विषयावर कोणतीच चर्चा करता सत्ताधारी एखादा विषय नामंजूर कसा काय करू शकतात याबाबत विरोधी पक्षातील सदस्यांनी आक्रमक भूमिका घेऊन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी यांना कायदेशीर मार्गदर्शन मागितले. परंतु कुळकर्णी यांनी सभेच्या नियमांवर बोट ठेवून बोलणेच पसंद केल्यामुळे आरोग्य केंद्राच्या मुद्यावर चर्चा झाल्याशिवाय पुढील कामकाज होऊ देण्याचा निर्णय घेतला. विरोधी पक्षातील सर्व सदस्य अध्यक्षासमोर आले त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यास सुरवात केली. दरम्यान, सत्ताधाधिकाऱ्यांकडूनही विजयाच्या घोषणा देण्यात आल्यानंतर सभागृहातील गोंधळ वाढला. दरम्यान, अध्यक्ष गोंडाणे यांनी संबंधित विषय बहुमताने नामंजूर करण्यात येत असल्याचे सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षातील सर्वच सदस्य अधिकच आक्रमक झाल्याने अध्यक्षांनी अर्ध्या तासातच सभा संपल्याचे जाहिर केले. त्यानंतर विरोधी पक्षातील सर्व सदस्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात धाव घेवून पुन्हा कायदेशीर मार्गदर्शन मागितले. यावरही समाधान झाल्याने विरोधी पक्षातील सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे तक्रार करण्याची भूमिका घेतली. या सभेला अध्यक्ष नितीन गोंडाणे, उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, सभापती जयंत देशमुख, बळवंत वानखडे, सुशीला कुकडे, वनिता पाल, अधिकारी उपस्थित होते. 
 

व्यासपीठाखालून सभा चालवण्यास आक्षेप
 सर्वसाधारण सभेत उपस्थित झालेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुद्यावरून काँग्रेसचे गटनेते बबलू देशमुख अध्यक्ष नितीन गोंडाणे यांना विषय बहुमताने नामंजूर झाल्याचे सांगत होते. यावर विरोधी पक्षातील सदस्यांनी आक्षेप घेतला.अध्यक्ष व्यासपीठावर असताना व्यासपीठाखालून सूचना देऊन यापुढे सभागृह चालू देण्याची भूमिका विरोधी गटातील सदस्यांनी घेतली.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...