आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीराज चव्हाणांचे धोरण ढिसाळ; फायली महिनाेन््महिने अडकून पडल्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यापाठाेपाठ याच पक्षाचे माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यशैलीवर तोफ डागली आहे. चव्हाणांचे धोरण बोटचेपे आणि ढिसाळ होते, या शब्दात त्यांनी टीका केली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी अाघाडीचे सरकार हाेते. मात्र या दाेन्ही पक्षांतील वादामुळे अखेर अाघाडीला पायउतार व्हावे लागले व राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार सत्तारूढ झाले. या पार्श्वभूमीवर खासदार पटेल यांनी दाेन दिवसांपूर्वीच चव्हाणांच्या कार्यपद्धतीवर टीका केली हाेती. ‘चव्हाण स्वत:ही बुडाले व साेबत अाम्हालाही (राष्ट्रवादीला) घेऊन बुडाले,’ अशा शब्दांत त्यांनी पृथ्वीराजबाबांच्या कार्यपद्धतीचा समाचार घेतला हाेता. त्यांच्यापाठोपाठ चव्हाणांच्या मंत्रिमंडळात राहिलेले राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनीही बाबांच्या कार्यशैलीवर तोंडसुख घेतले आहे. ‘पृथ्वीराज चव्हाणांचे धोरण ढिसाळ व बोटचेपे होते. काँग्रेसच्या अनेक मंत्र्यांसह मीदेखील त्यांच्या या धोरणाचा साक्षीदार राहिलो अाहे. एखाद्या लोकोपयोगी योजनेची अथवा उपक्रमाची फाइल त्यांच्याकडे पाठवल्यावर ती कित्येक महिने त्यांच्याकडे पडून रहायची. वारंवार विनंती करून ती योजना लोकांच्या उपयोगाची आहे हे पटवून दिल्यानंतरच ते त्याकडे लक्ष देत होते. त्यातही ते नाना प्रकारे चौकशी करून वेळकाढू धोरण अवलंबत होते. त्यामुळे फायली निकाली निघायला बराच विलंब व्हायचा. त्यांच्यामुळे राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले,’ असा अाराेपही अनिल देशमुख यांनी केला आहे.
‘लकव्या’चा टाेला
दाेन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या ताेंडावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सरकारमधील फायली हलत नसल्याचा अाराेप करत ‘मुख्यमंत्र्यांच्या हाताला लकवा भरलाय का?’ असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव न घेता केला हाेता. त्यानंतरही राष्ट्रवादीच्या सर्वच नेत्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना टार्गेट केले हाेते.
बातम्या आणखी आहेत...