आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हाफपॅन्टवाले काँग्रेसचे विचार संपवू शकत नाहीत; काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांची टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- ‘हाफपॅन्टवरून फुलपॅन्टवर गेलेल्या लोकांनी कितीही इतिहास बदलण्याचे प्रयत्न केले तरी देशातील जनता काँग्रेस आणि इंदिरा गांधींचे विचार विसरणार नाहीत. सध्याच्या सरकारने देशातील जनतेचा भ्रमनिरास झाला असल्याने आता मिशन २०१९ सज्ज व्हा’, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केले.  


नागपुरात आयोजित इंदिरा गांधी जन्मशताब्दी सांगता समारंभात ते बोलत होते.  माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, उपनेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते.  चव्हाण म्हणाले, सध्या देशातून गांधी, नेहरू, आंबेडकर आणि इंदिराजींचे  विचार पुसून टाकण्याचे प्रयत्न होत आहेत. देशातील महत्त्वाच्या संस्थांवर विशिष्ट विचारांची माणसे बसवण्याचे ही काम सुरू आहे. मात्र या देशातील जनता काँग्रेसचे विचार विसरू शकत नाही. इंदिराजींनादेखील पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर त्या पुन्हा नव्या जोमाने सत्तेवर आल्या होत्या. हा इतिहास न विसरता काँग्रेसजनांनी आता आपसात न भांडता मिशन २०१९ साठी सज्ज झाले पाहिजे. गुजरातमध्ये राहुल गांधी भाजपला जबरदस्त टक्कर देत आहेत. तेथील सरकार हादरले आहे. पंतप्रधान मोदी यांना गुजरातमध्ये तळ ठोकून बसावे लागते आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...