आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशोक चव्हाणांवर शाईफेकप्रकरणी चौघांवर गुन्हा, अद्याप कुणालाही अटक नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्या अंगावर शाईफेकप्रकरणी आरोपी ललित बघेलसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपुरात हसनबाग परिसरातील शनिवारी रात्री एका प्रचारसभेत चव्हाणांवर यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. शाईफेकप्रकरणी पोलिसांनी अद्याप एकाही आरोपीला अटक केलेली नाही. 

अशोक चव्हाणांवर शाईफेक केल्याप्रकरणी ललित बघेल याला चव्हाण समर्थकांनी त्याला चांगलाच चोप दिला होता. पोलिसांनीही त्याला ताब्यात घेतले होते. मात्र, तो गंभीर जखमी झाल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. ललित बघेलवर रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे. ललित बघेल याने इतर तिघांची नावे पोलिसांना सांगितले आहेत.
आरोपी बघेल हा जखमी असल्याने सध्या त्याला अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. इतर तिघे आरोपी फरार आहेत. शाईफेक करणारा ललित बघेल हा काँग्रेसचाच कार्यकर्ता असल्याचे समजते.

शाईफेकीमागे भाजप : अशोक चव्हाण
शाईफेकीमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपचा हात असल्याचा आरोप चव्हाण यांनी सभेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. शाईफेक करणारा आरोपी सतीश चतुर्वेदी यांचा कार्यकर्ता आहे, असेही चव्हाण यांनी म्हटले आहे. या घटनेची पक्षातर्फेही चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

पुढच्या स्लाईडवर वाचा, शाईफेकनंतर काँग्रेसमध्ये ‘सर्जिकल स्ट्राइक’चे संकेत, केंद्रीय नेतृत्‍वाने घेतली गंभीर दखल...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...