आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत सावली काहीवेळासाठी होणार गायब, दरवर्षीचा चमत्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
अमरावती- कोणी आपल्यासोबत असो अथवा नसो सावली मात्र मनुष्याची साथ कधीच सोडत नाही, असे म्हटले जात असले तरी वर्षातून एक दिवस काही वेळासाठी का होईना ती साथ सोडत असते. हेच आश्चर्य अन् निसर्गाचा चमत्कार आहे. अमरावतीकरांना गुरुवार २५ मे रोजी याचा अनुभव येणार आहे. म्हणूनच याला शुन्य सावली दिवस अर्थात ‘झिरो शॅडो डे’ असे म्हणतात. 
पृथ्वीवर मकर वृत्ताच्या दक्षिणेकडील भागात तर कर्क वृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीही डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो. परंतु, या दोन टोकांच्या वृत्तामधल्या लोकांना वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायला मिळतो. जेव्हा सूर्य बरोबर डोक्यावर असतो तेव्हा आपली सावली सरळ आपल्या पायाखाली पडते. जणूकाही सावली दिसेनाशी झाली असा काहीवेळ भास होतो. संपूर्ण पृथ्वीवर एकाच दिवशी शुन्य सावली दिसते असे नाही. तर वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या भागात हा अनुभव येत असतो. मे महिन्यातच शुन्य सावली दिवसाचा अनुभव घेता येतो. विदर्भात अमरावतीत २५ मे रोजी, अकोला येथे २४ मे रोजी आणि नागपुरात २६ मे रोजी शुन्य सावलीचा अनुभव येणार असल्याची माहिती खगोल तज्ज्ञांनी दिली आहे. 

सावलीचा खेळ तसा जुनाच असला तरी २५ मे रोजी सावलीच नाहीशी होणार म्हटल्यावर नेमके काय होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. एव्हाना बच्चे कंपनी अशा नैसर्गिक चमत्कारीक गोष्टींबाबत फारच जागृत झाल्यामुळे ती आतुरतेने २५ मे या दिवसाची वाट बघत आहे. हा सावलीचा खेळ म्हणजे एक खगोलीय चमत्कार आहे. त्यामुळे याबाबत अन्य कोणताही विचार करण्याची गरज नाही. असे दरवर्षीच घडत असते. 
 
स्वत:च करता येईल निरीक्षण 
सूर्य २५ मे रोजी डोक्यावर आल्यानंतर शुन्य सावलीचा अनुभव प्रत्येकाला स्वत:च घेता येईल. हा रोमांच अनुभवण्यासाठी अनत्र कुठेही जाण्याची गरज नाही. आपण एखाद्या रस्त्यावर चालत असलो तर आपल्याला आपलीच सावली गायब झाल्याचे दिसेल. किंवा झाडाची सावलीही नेहमीपेक्षा फारच कमी दिसेल. सकाळी १०.३० पासून शुन्य सावलीचे निरीक्षण करता येईल. 
 
खगोल प्रेमींनी हा रोमांचकारी अनुभव घ्यावा 
- नेहमीसावलीही तिरपी मोठी दिसते. परंतु, अमरावतीत २५ मे रोजी सावली पायाखाली दिसेल. विद्यार्थ्यांनी हा प्रयोग अवश्य करून बघावा. एखादी वस्तू उन्हात ठेऊन त्या वस्तुची सावली कशी पडते याचे निरीक्षण करावे. त्यांना स्वत:च निसर्गाचा हा चमत्कार अनुभवता येईल.’’ विजयगिल्लूरकर, हौशी खगोल तज्ज्ञ, अमरावती 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...