आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावर तस्करांकडून पोलिस पथकाला जीवे मारण्याचा प्रयत्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला जनावरांची तस्करी करणारा ट्रक.या ट्रकमध्ये १९ जनावरांना अशा प्रकारे कोंबून नेण्यात येत होते. - Divya Marathi
वणी पोलिसांनी ताब्यात घेतलेला जनावरांची तस्करी करणारा ट्रक.या ट्रकमध्ये १९ जनावरांना अशा प्रकारे कोंबून नेण्यात येत होते.
वणी - गोवंशहत्या बंदी लागू झाल्यानंतर सीमेलगतच्या तेलंगणा राज्यात जनावर तस्करीचे प्रमाण वाढले असून नागपूर ते वरोरा, वणी, शिरपूर, कोरपना मार्गे होणारी जनावरांची तस्करी रोखण्याचा प्रयत्न रविवारी वणी पोलिसांसाठी धोक्याचा ठरला. जनावर भरलेले ट्रक चालकांनी पोलिसाच्या वाहनावर चढवण्याचे प्रयत्न केला. मात्र पोलिस वाहन चालकाच्या प्रसंगावधानाने पोलिस पथकाचा जीव वाचला. त्यानंतरही आपल्या जीवाची पर्वा करता पोलिसांनी रात्रीच्या अंधारात ७० किमीपर्यंत ट्रकचा पाठलाग करून घुग्गुस येथील वर्धा नदीजवळ १९ गोवंश भरलेला ट्रक अडवून जप्त केला. मात्र अंधाराचा फायदा घेऊन ट्रक चालक फरार झाला. 
 
पाटाळा गावाकडून वणीच्या दिशेने जनावर भरलेले ट्रक येत असल्याची माहिती वणीचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांना मे रोजी रात्री पोलिस कंट्रोल रूम यवतमाळ विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांकडून मिळाली. त्यावरून ठाणेदार कुलकर्णी यांनी पोलिस स्टाफसह रात्री ९.४० वाजता वरोरा रोड रेल्वे क्रॉसिंगजवळ नाकाबंदी केली असता, पाटाळाकडून एक ट्रक प्रचंड वेगाने पोलिस वाहनाजवळून निघाला. पोलिस पथकाने पोलिस जीप पलटवून ट्रक समोर येऊन ट्रक थांबवण्याचा इशारा केला असता, ट्रक चालकाने जीपवर ट्रक चढवण्याचा प्रयत्न केला.
 
जीपचालकाने प्रसंगावधान राखून जीप रस्त्याचा बाजूने केल्याने पोलिसांचा जीव वाचला. या ट्रक चालकाने पुढे असलेले टोल नाक्यावरील बॅरिकेड्स तोडून शिरपूरकडे भरधाव ट्रक नेला. पोलिसांनी ट्रक थांबवण्यासाठी शिरपूर ठाण्यात माहिती देऊन चारगाव चौक येथे नाकाबंदी केली. मात्र ट्रक चालकाने ट्रक थांबवता घुग्गुस मार्गे पळवला. ट्रकचा पाठलाग करित पोलिस नायगाव जवळ पोहोचले असता, ट्रक चालकाने ट्रक पलटवून दुसऱ्यांदा पोलिसांच्या जीपवर ट्रक
चढवण्याचा प्रयत्न केला. 
 
त्यानंतर घुग्गुस पोलिसांनी रेल्वे गेट बंद करून नाकाबंदी केली असता ट्रक चालकाने वर्धा नदीच्या पुलाजवळील कुबेर ट्रान्सपोर्ट कंपनीच्या पार्किंगमध्ये ट्रक लावून अंधाराचा फायदा दोन ते तीन साथीदारांसह पोबारा केला. 
 
पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता १९ बैल कोंबून दिसले. त्यानंतर सर्व बैल किंमत लाख ७५ हजार ट्रक क्रमांक एमएच ४० वाय ९४८६ किंमत १० लाख असा एकूण १४ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त करून फरार ट्रक चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांना जीवे मारण्याच्या प्रयत्न कल्यावरून पीएसआय जयप्रकाश निर्मल यांच्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध कलम ३०७ ,३४ अन्वये दुसरा गुन्हा दाखल केला. 
 
यांनी केली कारवाई 
ही कारवाई पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अप्पर पोलिस अधीक्षक अमरसिंग जाधव, एसडीपीओ राहुल मदने यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार मुकुंद कुलकर्णी, पीएसआय जयप्रकाश निर्मल, सुदर्शन वानोळे, सुनील खंडागळे, सुधीर पांडे, सुनील कुंटावार, दिलीप जाधव, तसेच एसडीपीओ पथकाचे इक्बाल शेख, महेंद्र भुते, आशिष टेकाडे वाहन चालक प्रशांत आडे यांनी केली. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...