आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धामणगाव रेल्वे: भरधाव ट्रकने 12 वर्षीय सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर-औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरील देवगाव चौफुलीवर अपघातास कारणीभूत ट्रक. - Divya Marathi
नागपूर-औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरील देवगाव चौफुलीवर अपघातास कारणीभूत ट्रक.
नागपूर-औरंगाबाद एक्सप्रेस हायवेवरील देवगाव चौफुलीवर भरधाव ट्रकने १२ वर्षीय सायकलस्वार विद्यार्थ्याला चिरडले. ही घटना रविवारी १६ एप्रिलला सकाळी दहाच्या सुमारास घडली. पवन जोशी असे मृत विद्यार्थ्याचे नाव असून, यवतमाळ येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला. 
 
या घटनेच्या वेळी पवन हा देवगाव चौफुलीकडे भाजीपाला घेण्यासाठी सायकलने चालला होता. त्याच वेळी नागपूर-औरंगाबाद एक्स्प्रेस हायवेने ट्रक क्रमांक (एमएच ३४/ ऐबी ९७७०) यवतमाळ्कडे जात होता. त्याच वेळी पुलगाव रस्त्यावरून देवगाव चौफुलीकडे भाजीपाला घेण्यासाठी सायकलने जात असलेला पवन हा रस्ता ओलांडत होता. यावेळी झालेल्या अपघातानंतर जखमी अवस्थेत त्याला यवतमाळ येथे उपचारासाठी नेताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान चालकाने अपघातानंतर ट्रक घेऊन घटना स्थळावरून पळ काढला होता, परंतु पोलिस, नागरिकांनी यवतमाळ मार्गावर किलोमीटरवर ट्रक अडवला. मात्र चालक ट्रक सोडून पळून जाण्यात यशस्वी झाला. या संदर्भात तळेगाव दशासर ठाण्यात देवगावातील शेख रशीद यांनी फिर्याद नोंदवली. या अपघातप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास संजय राठौड, पंकज वाट करीत आहेत. 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...