आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योगपतींचे पुनर्रचित कर्ज 13 लाख कोटींवर, बँक कर्मचाऱ्यांनी दिला 22 ऑगस्टला संपाचा इशारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो) - Divya Marathi
(फाइल फोटो)
अमरावती - उद्योगपतींच्या पूनर्रचित कर्जाची रक्कम १३ लाख कोटींवर गेली असून बँकींग क्षेत्रात वाढत्या अनर्जक आस्ती (एनपीए) अर्थात परतफेड झालेल्या कर्जांचे प्रमाण साडे सात लाख कोटी पेक्षा अधिक असल्याची माहिती ऑल इंडिया बँक एम्लाइज असोसिएशनचे जाइंट सेक्रेटरी देवीदास तुळजापुरकर यांनी दिली. सामान्य जनतेच्या पैशांची लूट थांबविण्याच्या मागणीला घेऊन बँक कर्मचाऱ्यांनी २२ ऑगस्टला संपाचा इशारा दिला आहे. 
 
जाणून बुजून बँकांचे कर्ज बुडवणे हा भारतीय दंड संहिते प्रमाणे गुन्हा ठरवावा. अश्या गुन्हेगारांना निवडणूक लढविण्यास बंदी घालावी. अनर्जक अास्ती (एनपीए) ची वसुली करण्यासाठी कठोर पावले उचलावे. मोठ्या उद्योगपतींनी बँकेची कर्जे बुडवली आहे. जनतेसमोर त्यांच्या नावांची यादी प्रसिद्ध करावी. देशातील सामान्य जनतेवरील अन्यायकारक वाढविण्यात आलेले बँकींग चार्जेस कमी करण्यात यावे. शेतकरी, विद्यार्थी, छोटे उद्योजकांना स्वस्त दरात कर्जे उपलब्ध करुन देण्यात यावी, त्यांची पिळवणूक करण्यात येऊ नये. देशाला राष्ट्रीयकृत बँकांच्या विलिनीकरणाची नव्हे तर विस्ताराची गरज आहे. सुदूर खेड्यांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा सुरू करा. विलीनीकरणामुळे बँकांच्या शाखा बंद होतील. 
बातम्या आणखी आहेत...