आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अजय बन्सोड खून प्रकरणी एकास जन्मठेप, मृतकाची पत्नी, मुलाला लाखांची भरपाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ- येथील अजय बनसोड याच्या खून प्रकरणात एकास आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश डी. आर. शिरासाव यांनी बुधवारी हा निर्णय दिला. त्यासोबतच मृताच्या पत्नी मुलाला लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्णयामध्ये नमूद केले.

रितेश उर्फ बल्ली बावीसकर असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. २० मे २०१४ रोजी सायंकाळी अजय भीमराव बनसोड हा दुचाकीने जात असताना पाटीपुरा परिसरातील महात्मा फुले चौक येथे रितेश बावीसकर आणि त्याच्या अन्य काही साथीदारांनी त्याला वाटेत अडवले. त्यानंतर त्याच्याशी वाद सुरू केला. त्यात रितेश बावीसकर याने अजय बनसोड याच्यावर चाकूने वार करुन त्याचा खून केला. या प्रकरणी मृताची पत्नी ज्योती अजय बनसोड हिने यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून पोलिसांनी एकूण आठ जणांविरुद्ध गुन्हा नोंद करुन त्यापैकी जणांना अटक केली होती. जन फरार असल्याने सहा जणांविरुद्ध हे प्रकरण न्यायप्रविष्ट करण्यात आले. या प्रकरणाच्या सुनावणीदरमान सरकारी पक्षाच्या वतीने एकूण १४ साक्षी तपासण्यात आल्या. त्यात वैद्यकीय अहवाल आणि डॉक्टरांची साक्षीवरुन सहा जणांपैकी रितेश उर्फ बल्ली बावीसकर याला आजन्म सश्रम कारावास ठोठावला.

या प्रकरणात फिर्यादी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी वकील नरेंद्र बी. मेश्राम यांनी बाजू मांडली. विशेष म्हणजे या प्रकरणात मृत अजय बनसोड याची पत्नी ज्योती बनसोड मुलगा हे दोघे निराधार झाले असल्याने शासनाकडून त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी नरेंद्र बी. मेश्राम यांनी न्यायालयाकडे केली होती. त्यावरुन प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश डी. आर. शिरासाव यांनी मृताच्या पत्नीला लाख रुपये आणि मुलाला लाख रुपये नुकसान भरपाई देण्यातचे निर्णयात नमूद केले.
बातम्या आणखी आहेत...