आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यू हायस्कूलच्या बेलपुरामधील शाळेत ‘नेमके’ चाललेय काय?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- नूतन विदर्भ शिक्षण मंडळाच्या न्यू हायस्कूल बेलपुरा शाळेत मुख्याध्यापकांनी शिक्षकांना ‘टार्गेट’ करण्यासाठी विद्यार्थ्यांनी लेखी तक्रारी कराव्यात,अशी ‘विशेष’ नोटीस बजावली. पोलिस प्रशासनाच्या सूचनेनुसार ही नोटीस काढल्याचा दावा मुख्याध्यपकांनी लेखी स्वरुपात केला आहे. शाळा व्यवस्थापन ही त्यांच्या या कृत्याच्या पाठीशी आहे. प्रत्यक्षात मात्र काेणत्याही शाळा व्यवस्थापनाला अशा कोणत्याच सूचना दिलेल्या नाहीत, असे पोलिस प्रशासनाचे म्हणणे आहे.
विशेष म्हणजे संस्थेच्याच इतर शाळा,महा विद्यालयातही अशा कोणत्याच सूचना काढलेल्या नाहीत. मात्र, मुख्याध्यापक पोलिसांचा दावा दाखवत आपले कृत्य बरोबर असल्याचे भासवत आहेत. त्यामुळे शाळेत ‘नेमके’ चाललेय तरी काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. वर्गात शिकविणाऱ्या शिक्षक-शिक्षिकांविरुद्ध माझ्याकडे लेखी तक्रारी करा, असे बजावत तशा प्रकारची नोटीस बेलपुरा न्यू हायस्कूलचे मुख्याध्यापक गजानन श्रीनाथ यांनी सप्टेंबर २०१६ रोजी विद्यार्थ्यांसाठी काढली. तुम्हाला शिकविणारे शिक्षक-शिक्षिका वर्गात वेळेवर येत नसतील, पाठ व्यवस्थित शिकवित नसतील, शारीरिक अथवा मानसिक छळ करीत असतील, कारण नसताना रागवत असतील, खाेटे बाेलायला शिकवित असतील, अशा शिक्षक -शिक्षिकांविरुद्ध माझ्याकडे लेखी तक्रार करा अशी नोटीस मुख्याध्यापकाने काढली. ही नोटीस मुख्याध्यापकाने शासनाकडून तसेच पोलिस विभागाकडून वारंवार दिल्या जाणाऱ्या सूचनांचा आधार घेऊन काढली असल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. मात्र वास्तवात अशा स्वरूपाच्या सूचना दिल्या नसल्याचे पाेलिस विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान संबंधित शाळेमध्ये ते १२ वी पर्यंत वर्ग आहेत. याव्यतिरिक्त संस्थेचे उर्वरित.पान

शाळा-महाविद्यालयआहेत. त्यामुळे या शाळांमध्ये हा नियम लागू केला नसताना केवळ न्यू हायस्कूल बेलपुरा शाळेला बंधनकारक का, असा सवाल शिक्षक संबंधितांनी उपस्थित केला आहे. विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचे अध्यापन,वागणूक संबंधी तसेच त्यांच्या अध्यापनाविषयी प्रतिक्रीया गोळा करणे ही सध्या बदलत्या शैक्षणिक प्रक्रियेतील महत्वाची बाब असल्याचे व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. मग हीच बाब संस्थेच्या इतर शाळांना का लागू करण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास योग्य पद्धतीने शिक्षण देण्याची जागरुकता केवळ बेलपुरा येथील शाळेतच का ? या नोटीसचे पालकांकडून स्वागत करण्यात आल्याचे मुख्याध्यापकांनी म्हटले आहे. त्यामुळे व्यवस्थापन एकाच शाळेचे तेथील विद्यार्थ्यांचे ‘हित’ का जोपासत आहे,संस्थेच्या इतर शाळा,महाविद्यालयात रामराज्य आहे का असा प्रश्न जाणकार उपस्थित करत आहेत.

संस्थेच्या अन्य शाळेत लेखी सूचना नाही
न्यू हायस्कूल बेलपुरा या शाळेव्यतिरिक्त संस्थेच्या अन्य शाळा-महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारची लेखी स्वरुपाची सूचना काढण्यात आलेली नाही. अन्य शाळा-महाविद्यालयात मौखिक सूचना देण्यात आल्या आहेत. निनाद सोमण, सचिव, नूतन विदर्भ शिक्षण मंडळ.

आमसभेतही गाजले ‘एचएम’चे प्रताप
नूतनविदर्भ शिक्षण मंडळ पगारदार पतसंस्थेची आमसभा शनिवारी पार पडली. या सभेत मुख्याध्यापकांचे प्रताप चर्चीले गेले. ३० ऑगस्ट रोजी मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सूचना काढली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘कोणत्याही कामानिमित्य माझ्या कक्षात यावयाचे असल्यास अथवा बोलविले असल्यास कोणीही मोबाइल, पर्स, पिशवी यापैकी कोणतेही साहित्य सोबत घेऊन येऊ नये.’ याबाबत काही शिक्षकांनी विचारणा केली असता खासगीत आपण ‘काहीही’ बोलतो, शिक्षक-शिक्षिका रेर्काडींग करू शकतात,असा खुलासा मुख्याध्यापकाने केल्याचे सुत्रांनी सांगितले. मुख्याध्यापकांच्या एकूणच वागणुकीबाबत गंभीर आणि धक्कादायक आरोपही संबंधित करताना दिसत आहेत.
बातम्या आणखी आहेत...