आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूर :किशाेरवयीन स्टंटबाजांच्या पालकांची सीपींसमोर ‘पेशी’, अकरा स्टंटबाजांना पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरालगतच्या मार्गांवर असे जीवघेणे स्टंट केले जातात - Divya Marathi
शहरालगतच्या मार्गांवर असे जीवघेणे स्टंट केले जातात
अमरावती - किशोरवयीन मुलांना लाखो रुपयांच्या दुचाकी घेऊन देण्याची हौस शहरातील काही सुखवस्तू पालकांना चांगलेच महागात पडत आहे. रस्त्यांवर दुचाकी उडवून थरार निर्माण करणाऱ्या या कोवळ्या मुलांच्या करणीचे फळ ‘सुजाण’ पालकांना भोगावी लागत आहे. दरम्यान शहराच्या सभोतालचे गुळगुळीत रस्ते या किशोरवयीन मुलांच्या जीवघेण्या सर्कशीचे केंद्र ठरले आहे. अलीकडेच झालेल्या दोन घटनांमुळे पोलिस आयुक्तांनी स्टंटबाजांवर कारवाईसाठी गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार केले. या पथकाने शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी आतापर्यंत अकरा स्टंटबाजांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांना पोलिस आयुक्तांपुढे हजर केले आहे तसेच त्यांच्याविरुध्द प्रतिबंधात्मक कारवाईसुद्धा केली आहे. 
 
शहराबाहेरील नविन एक्सप्रेस हायवे, विद्यापीठ ते मार्डी मार्ग, चांदूर रेल्वे मार्ग हे मार्ग या स्टंटबाजांचे स्टंट करण्यासाठी अावडीचे मार्ग आहे. या मार्गावर जीवघेणे स्टंट केल्यास त्यांच्याच जीवीताला धोका आहे मात्र हे शहरातून दुचाकी चालवतानाही सुसाट वेग स्टंटबाजीचे प्रयोग करतात, त्यावेळी मात्र सर्वसामान्य वाहनचालकांच्या जीवावर हे स्टंटबाज उठतात. पाच दिवसांपुर्वी एका पुजाऱ्याला अशाच एका स्टंटबाजांने धडक दिली आणि या धडकेत पुजाऱ्याचा मृत्यू झाला. आज त्या पुजाऱ्याचे कूटूंब उघड्यावर आले आहे कारण पुजारीच त्या कुटूंबातील कर्ता व्यक्ती होता. तसेच विद्याभारती महाविद्यालयासमोरसुध्दा एका स्टंटबाजाने धडक दिल्यामुळे वृध्देच्या पायाला दुखापत झाली. या दोन घटना मोठ्या असल्यामुळे पोलिसांपर्यंत पोहचल्या, गुन्हा दाखल झाला, त्याची चर्चा झाली. मात्र दरदिवशी अशा स्टंटबाजांमुळे कित्येक सर्वसाधारण वाहनचालकांचे ‘हार्टबीट’ वाढत असतील, याचा अंदाजच नाही. कारण हा स्टंटबाज कधी ८० ते १०० च्या गतीने येईल आणि सर्वसामान्य वाहनचालकाला कट मारुन निघून जाईल, याचा नेम उरलेला नाही. त्या मस्तवाल स्टंटबाजांसाठी ही बाब गंभीर नसेलही कारण त्याला हे करण्यात असूरी आनंद होत असेल मात्र ज्या सर्वसामान्य व्यक्तीच्या बाजूने तो कट मारून जातो, तो व्यक्ती रस्त्याच्या बाजूला वाहन उभे करून दोन मिनीट देवाचे नामच स्मरण करतो, कारण त्याचे ‘हार्टबीट’च तेवढे वाढलेले असते. स्टंटबाजांचा शहरात वाढलेला अतिरेक सर्वसामान्यांच्या जीवावर उठला आहे, त्यामुळे पोलिस आयुक्तांनी गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रविण पाटील यांच्या नेतृत्वात पथक तयार केले. सद्या पीएसआय पाटील वाहतूक शाखेचे कर्मचारी या स्टंटबाजांना पकडण्याचे काम करत आहे. पोलिसांनी शहरातील ५० ते ६० स्टंटबाजांची माहीती नावे काढली. तसेच त्यांच्या स्टंटबाजांचे छायाचित्र व्हीडीओ चित्रण मिळवले. त्या आधारे दुचाकीचा क्रमांक दुचाकी क्रमांकावरून त्याचा पत्ता शोधून त्यांना पकडण्याचे काम सुरू आहे.
 
पुढील स्लाईडवर वाचा, स्टंटबाजांचे पालक शासकीय अधिकारी...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...