आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांकडून दानवेंना क्लीन चिट, \'साले\' शब्दावरून झाली होती चौफेर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - शेतकऱ्यांविषयी अाक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या अाराेपामुळे विराेधकांच्या टीकेचे धनी ठरलेले भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून मात्र क्लीन चिट मिळाली अाहे. "दानवेंच्या बोलण्याचा लहेजा ग्रामीण ढंगाचा असल्याने त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. मात्र  त्यांचा हेतू शेतकऱ्यांना दुखावण्याचा नव्हता,’ असे सांगत शहा यांनी दानवेंची पाठराखणच केली.  
 
शहा हे जूनच्या दुसऱ्या आठवड्यात मुंबईत येत अाहेत. तीन दिवसांच्या दाैऱ्यात ते मंत्री, खासदार, आमदार, प्रमुख पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन पक्षाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, दानवेंच्या अाक्षेपार्ह भाषणाबाबतचा अहवाल शहा यांनी यापूर्वीच मागवून घेतला अाहे. ‘दानवेंच्या भाषणाचा ग्रामीण लहेजा असून गावखेड्यात एकमेकांशी बोलतात तसाच संवाद ते भाषणात करत असतात. पण त्याचा अर्थ ते कोणाला मुद्दामहून दुखावतात, असे होत नाही,’ असे अहवालात म्हटले होते. 
 
 
पुढील स्लाइडवर पाहा, काय म्हणाले होते दानवे... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...