आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंध दांपत्यच बनले २० अंध मुलींच्या जगण्याचा आधार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अंधांना शिक्षणासाठी हलाखीच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो, ही बाब स्वअनुभवातून जाणून अमरावतीतील एका अंध दांपत्याने स्वखर्चाने २० अंध मुलींच्या शिक्षणासह घरीच निवास व भोजनाची व्यवस्था केली आहे. मागील नऊ वर्षांपासून त्यांची ही सेवा सुरू आहे.

पंजाब राघोराव पाटील आणि मंदा पाटील असे या दांपत्याचे नाव आहे. पंजाबराव महिंद विद्यालयात शिक्षक अाहेेत. अापल्या राेजगाराचा प्रश्न सुटल्यानंतर त्यांनी अापल्यासारख्या इतरांनाही मदत करण्याचा निर्धार केला. शिक्षणाची जिद्द अाहे, मात्र शासकीय वसतिगृहात निवासाची व्यवस्था नाही अशा अंध मुलींना त्यांनी अापल्या घरीच आधार देण्याचा निर्णय घेतला. २००६ मध्ये पाटील दांपत्याकडे ३ मुली होत्या. सन २००९ मध्ये मंदाताईंनासुद्धा सर्व शिक्षा अभियानमध्ये कंत्राटी स्वरूपात नोकरी लागली. मग या दांपत्याने स्वत:चे तीन खाेल्यांचे घर घेतले. त्यापैकी एक खोली मुलींसाठी दिली. सध्या पाटील यांच्या घरी वयाेगट ८ ते पदवीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या २० मुली आहेत. या मुलींच्या शिक्षणासह, त्यांना शाळेत पोहोचवणे, भोजनाची व्यवस्था आदी सर्व भार पाटील दांपत्यानी उचलला आहे. पाटील यांनी अपंग एकात्मिक विकास शैक्षणिक व बहुद्देशीय संस्थेची स्थापना केली आहे मात्र शासनाकडून अद्याप मदत झाली
पाच मुलींच्या लग्नाच्या खर्चाचाही भार पेलला
२० ते २५ हजार रुपये महिन्याकाठी खर्च
या मुलींसाठी व घरच्या व्यक्तींना असा एकूण महिन्याकाठी २० ते २५ हजारांचा खर्च येतो. हा खर्च पाटील हे स्वत:च्या वेतनातून करतात. ‘मला ३० हजार रुपये वेतन मिळते, जरी हा खर्च झाला तरी पाच हजार रुपये शिल्लक राहतात. काही व्यक्तींकडून अन्नदान मिळते, तसेच आम्ही पाच मुलींचे लग्न केले, त्या वेळीसुद्धा काही नागरिकांनी आम्हाला सहकार्य केले,’ असे पाटील सांगतात. सध्या पाटील यांच्याकडे मुंबई, पुणे, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, अकोला जिल्ह्यासह मध्य प्रदेशातीलही मुली अाहेत.

मुकेश व दीक्षा यांची महत्त्वाची भूमिका
पाटील यांचा भाचा मुकेश व भाचसून दीक्षा हे दोघे पाटील यांच्याकडेच राहतात. पाटील दांपत्यांचा खरा आधार तेच आहे. संस्थेेचे कामकाज, मंदा पाटील यांचे कार्यालयीन लिखापढीचे काम मुकेश हेच करतात, तर दीक्षा या घरातील संपूर्ण काम, मुलींसाठी स्वयंपाक करतात. त्यामुळे पाटील दांपत्याच्या या समाजसेवेमध्ये मुकेश व दीक्षाची महत्त्वाची भूमिका आहे.

आम्ही गेल्यावरही मुलींची व्यवस्था व्हावी
जोपर्यंत आम्ही आहोत, तोपर्यंत मुलींची आम्ही व्यवस्था करणारच आहोत. मात्र, ज्या वेळी आम्ही जाऊ त्यानंतरसुद्धा मुलींची अशाचप्रकारे काळजी घेतली जावी, असा आमचा प्रयत्न आहे व ती ईच्छा आहे. मुलींसाठी वसतिगृह व्हावे, यासाठी आमचा लढा सुरू आहे. मध्यंतरी काही राजकीय पुढाऱ्यांची मदत घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणीही मदत केली नाही. - पंजाबराव पाटील, शिक्षक
-अमरावतीतील पाटील पती- पत्नीची नऊ वर्षांपासून सेवा
-शासनाची दमडीही न घेता स्वखर्चातून निवास, भाेजन व्यवस्था
-काही दानशूर व्यक्तींकडून मिळते अन्नदान