आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस स्थानकावरील पार्किंगची अपुरी जागा, प्रवाशांचा त्रागा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील वर्दळीच्या मध्यवर्ती बस स्थानकावर वाहनतळासाठी असलेल्या अपुऱ्या जागेमुळे प्रवासी, त्यांना सोडणारे नातेवाईक िकंवा इतर कोणत्याही कामासाठी येथे येणाऱ्यांना चांगलाच त्रास सहन करावा लागतो. बस स्थानकावरील अपुरी जागा असलेले वाहन तळ सध्या ऐरणीचा प्रश्न आहे. 
 
शेकडो बसेस त्यातून प्रवास करणारे हजारो प्रवासी यांच्यासाठी पुरेसे वाहनतळ एसटी महामंडळाला अमरावती मध्यवर्ती बस स्थानकावर देता आले नाही. त्यामुळे येथे केवळ १०० ते १२५ मोटारसायकली ठेवता येतील एवढेच स्टँड आहे. सकाळी नोकरीसाठी बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या मोटारसायकलींमुळे ते फुल्ल होते. त्यानंतर प्रवाशांना सोडण्यास येणाऱ्यांना मोटारसायकल, कार किंवा इतर वाहन ठेवण्यासाठी येथे जागाच नाही. ते बस स्थानकाबाहेर पार्क करावे लागतात. यात वाहतूक पोलीस वाहने बाहेर उभी करू देत नाही. जबरदस्तीने उभी केली तर वाहतूक पोलीस ती उचलून नेतात त्यामुळे मग ती सोडवण्यासाठी २५० रु. चा भुर्दंड सहन करावा लागतो. 

त्यामुळे घरी वाहन असूनही अनेकांना आॅटो किंवा सिटी बसने येण्याशिवाय पर्याय नसतो. जर स्वत:चे वाहन आणले तर ते ठेवायचे कुठे, सुरक्षित राहील काय, वाहतूक पोलीस उचलून तर नेणार नाहीत ना, चोरीला तर जाणार नाही ना, असे एक ना अनेक प्रश्न प्रवासभर प्रवाशांना त्रस्त करीत असतात. त्यामुळे एसटी महामंडळाने बस स्थानकावर प्रवाशांना जास्तीत जास्त वाहने ठेवता येतील अशी साेय करायला हवी. त्याचप्रमाणे जर स्थानकावर मोकळ्या जागा असतील तर त्या वाहन तळ म्हणून उपयोगात आणाव्यात अशी मागणी आहे. 

मुख्य स्थानकावर सध्या जागा नाही. त्यामुळे स्थानक डेपोदरम्यान पार्सल कार्यालयाला लागून असलेली जी भिंत आहे तेवढी तोडून तेथे आम्ही परतवाड्याला जाणाऱ्या गाड्या उभ्या करणार आहोत. जर असे झाले तर काही जागा उपलब्ध होईल. तरीही पुरेशा जागेअभावी वाहनतळाचा प्रश्न गंभीर असल्याचे मत एसटी अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. 

शिवसेनाबेनोडा देणार आज निवेदन : मुख्यबस स्थानकावरून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. बरेचसे नागरिक स्वत:ची सायकल किंवा मोटारसायकल बस स्थानकावर असलेल्या स्टँडवर पुढील प्रवास बसने करतात. या स्टँडवर सकाळी नंतर स्वत:ची गाडी किंवा सायकल लावण्यास जागाच नसते. याशिवाय येथे दुसरे वाहन तळ नाही. त्यामुळे प्रवाशांना वाहन ठेवण्यासाठी जागाच नाही. परिणामी त्यांना वाहन पानटपरीच्या बाजुला किंवा जागा मिळेल तेथे ठेवून पुढील प्रवास करावा लागतो. परंतु, या बाहेर लावलेल्या वाहनांना वाहतूक पोलिस उचलून नेतात. मोठा आर्थिक दंडही आकारतात. प्रथम आपली गाडी चोरीला गेली असावी असाही काहींचा समज होतो. शहराचा वाढलेला विस्तार लक्षात घेता सर्वच ठिकाणावरून आॅटो किंवा सिटी बसने येणे शक्य नसते. जर वाहन आणले तर ते ठेवण्यास जागाच नाही. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. यानिमित्त १५ रोजी सकाळी ११ वाजता शिवसेना प्रभाग क्र. १० बेनोडा-दस्तुर नगरतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले जाणार आहे. 

वाहन तळाबाबत नियोजनच झाले नाही 
अमरावती हे विभागाचे ठिकाण असून येथून दररोज शेकडो बसेस ये- जा करतात. मात्र त्या दृष्टीने वाहन तळाचे नियोजनच झाले नाही. सध्या स्थानकाच्या पुढे मारोती मंदिराजवळ जे गाड्यांचे स्टँड आहे ते सकाळीच अप-डाऊन करणाऱ्यांच्या गाड्यांनी भरून जाते. त्यामुळे स्थानकावर गाडी लावून बाहेरगावी जातो म्हटले तरी प्रवाशांना त्यांचे खासगी वाहन िकंवा मोटारसायकल घरीच ठेऊन यावे लागते. यासाठी आॅटोच्या भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागतो. १०० मोटारसायकली पार्क केल्या की इतरांसाठी स्टँड बंद होते. अशात ज्यांच्याकडे कार आहे, त्यांना तर ती आणताही येत नाही. कारसाठी पार्किंगची सोयच नाही. 

राजापेठ स्थानक सुरू झाल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही 
^वाहनतळासाठीजागाच शिल्लक नाही. त्यामुळे पार्सल आॅफिजवळून परतवाड्याच्या बसेस सोडल्या जातील. यासाठी आतील भिंत काही प्रमाणात पाडावी लागणार आहे. याशिवाय पर्याय नाही. राजापेठ स्थानक सुरू झाले की, पार्किंगचा प्रश्नही आपोआप सुटेल. राजेशअडोकार, विभागीय नियंत्रक, एसटी.