आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकारण, यवतमाळ नगरपालिकेमध्ये भाजप-सेना युतीचा ‘पेच’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - नगरपालिकेच्या झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले आहे. मात्र नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत शिवसेनेच्या उमेदवार कांचन बाळासाहेब चौधरी विजयी झाल्या. त्यामुळे आता पालिकेत नगराध्यक्ष सेनेचा आणि बहुमत भाजपकडे अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. ही परिस्थिती पाहता हे दोन्ही पक्ष युती करणार की एकला चलोची भूमिका घेणार याचा तिढा मात्र अद्याप सुटलेला नाही.
येथील नगरपालिकेच्या ५६ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक २९ जागांवर विजय मिळवत भाजपने पालिकेत बहुमत प्राप्त केले आहे. तसेच शिवसेनेने जागा काबीज करण्यात यश मिळवले. त्यासोबतच नगराध्यक्षपदी शिवसेनेच्याच कांचन चौधरी विजयी झाल्या आहेत. त्यामुळे आता बहुमतात आलेल्या भाजपचे पालिकेवर वर्चस्व राहणार, की नगराध्यक्ष रुपाने शिवसेना हा हक्क बजावणार असा तिढा निर्माण झाला आहे.
पालिकेचे कामकाज योग्य पद्धतीने व्हावे, यासाठी एकाच पक्षाकडे सत्ता येणे अपेक्षित होते. मात्र निवडणुकीनंतर विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. राज्यस्तरावरील या दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींकडून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यावरून उमरखेड, पुसद, दारव्हा या नगरपालिकांच्या ठिकाणी युतीसाठी अनुकुल वातावरण तयार झालेले दिसून येत आहे. मात्र यवतमाळ पालिकेसंदर्भात अद्याप कुठलाही ठोस निर्णय
शिवसेना भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून घेण्यात आल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे नगरपालिकेत बहुमत एकाचे आणि नगराध्यक्ष दुसऱ्याचा अशी अवस्था कायम आहे.
यवतमाळ पालिकेत भाजपने बहुमत प्राप्त केल्यामुळे एखाद्या पक्षासोबत हातमिळवणी करायची आणि आपल्या वाट्याला येणाऱ्या सभापती पदांपैकी काही पदे वाटून घ्यायची मानसिकता अद्याप भाजपच्या काही नगरसेवकांची झालेली नाही. त्यामुळे नगरपालिकेत स्वबळावर सत्ता कायम ठेवायची, असा विचार काही नगरसेवकांकडून मांडण्यात येत आहे. पालिकेचे कामकाज सुरळीत चालावे, यासाठी भाजप आणि शिवसेनेने एकत्र येऊन पालिकेत
सत्ता स्थापन करायची, असा सूर भाजपच्या काही नगरसेवकांकडून काढण्यात येत आहे. या संदर्भात वेगवेगळी मते समारे येत असली, तरी अद्याप भाजप नेते राज्यमंत्री मदन येरावार आणि शिवसेनेचे नेते राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडून ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. युती करायची की, नाही याबाबत लवकरच शिवसेना आणि भाजप यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
भाजपनगरसेवकांची नागपुरात बैठक : भाजपच्यासर्व नवनियुक्त नगरसेवकांची एक बैठक शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत नागपूर येथे होणार आहे. पालिकेतील पक्षीय बलाबल पदभारासाठी अद्याप वेटींगच नगरपालिकेचा निकाल जाहीर होऊन दहा दिवस लोटले आहेत. असे असतानाही अद्याप शासनाच्या वतीने निवडणुकांच्या निकालाची अधिसूचना काढण्यात आलेली नाही. ही परिस्थिती पाहता नवनियुक्त नगराध्यक्ष आणि पालिकेचे सदस्य यांना पालिकेत त्यांचा पदभार स्वीकारण्यासाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार
असल्याचे दिसत आहे.

उपाध्यक्षपदासाठी सदस्यांकडून दावेदारी
पालिकेत युतीचा निर्णय झालेला नाही. तरी पालिकेत बहुमतात असलेल्या भाजपच्या काही नगरसेवकांनी उपाध्यक्षपदी वर्णी लागावी, यासाठी प्रयत्न सुरू केले. अंतिम निर्णय सर्वानुमते होणार आहे.तरी सुभाष राय, प्रवीण प्रजापती, अमोल देशमुख, नितीन गिरी, मनीष दुबे यांची नावे चर्चेत आहेत.
यवतमाळ नगरपालिका आणि जिल्ह्यातील इतर नगरपालिकेत युती करायची की, नाही या संदर्भात चर्चा करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांची एक बैठक शनिवारी आर्णी मार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीतच युती संदर्भात अंतिम निर्णय होऊन त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...