आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: एसडीपीओ पथकाने पकडली गोवंश तस्करी; 3 जणांना अटक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसडीपीओ पथकाने पकडली गोवंश तस्करी. - Divya Marathi
एसडीपीओ पथकाने पकडली गोवंश तस्करी.
वणी - कामठी येथून वणी मार्गे तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे कत्तलीसाठी ट्रकमध्ये कोंबून गोवंश तस्करी करणाऱ्या दोन जणांना येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने त्यांचे पथकाने शनिवारी मध्यरात्री अटक केली असून, आरोपींकडून २१ बैल १० चाकी ट्रकसह एकूण लाख हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तस्करांकडून ताब्यात घेतलेले गाेवंश संस्कार माऊली गोशाळेच्या स्वाधीन करून तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल केला. 
 
एसडीपीओ राहुल मदने पथकासह २५ फेब्रुवारी रोजी ११ वाजतापासून ऑल आऊट स्कीम पेट्रोलिंग नाकाबंदी गस्तीवर असताना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून पथकातील नापोका महेंद्र भुते, इक्बाल शेख, आशिष टेकाडे यांनी वरोराकडून येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ४० वाय २१६० या दहाचाकी ट्रकला रात्री १.२५ वाजता घुग्घुस रोड टोल नाक्याजवळ अडवून ट्रकची तपासणी केली. त्यामध्ये २१ बैल कोंबल्याचे आढळले. पोलिसांनी ट्रक चालक कॅबिनमधील अन्य दोघांना विचारणा केली असता, हे बैल कत्तलीसाठी आदिलाबादला नेत असल्याची सांगितले. जनावर वाहतुकीचा परवाना नसल्यामुळे एसडीपीओंनी याबाबत पोलिस ठाण्यात माहिती देऊन सहायक उपनिरीक्षक काकडे यांना बोलावले. पोलिसांनी दोन पंचाच्या उपस्थितीत पंचनामा करून जनावरांसह ट्रक आरोपींना ठाण्यात आणले. २१ बैल किंमत लाख हजार तसेच ट्रक किंमत लाख रुपये, असा एकूण लाख हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रक चालक मो. शहबाज मो. नवाज वय २७ रा. गांधीनगर कामठी, मुस्लिम रजा शमशिर हुसेन वय २६ रा. पुराणा भोईपुरा, कामठी मो. सादिक मो. सईद वय १९ रा. भाजीमंडी, गांधीनगर कामठी यांना अटक केली आहे. 

सतर्कतेमुळे १४ जनावरांची सुटका
यवतमाळ - कत्तल करण्याच्या इराद्याने गोदामात डांबून ठेवलेल्या १४ जनावरांची टोळी विरोधी पथकाने सुटका केली. ही कारवाई रविवारी आरटीओ कार्यालयाच्या मागील परिसरातील समीर ले-आऊटमध्ये पहाटे ४.३० वाजता केली. पोलिसांनी मोहम्मद इलियास उर्फ शेख मेहबूब कुरेशी वय ३७ रा. कुरेशीपुरा यास अटक केली आहे. समीर ले-आऊट परिसरातील एका गोदामात जनावरे डांबून ठेवल्याच्या माहितीवरून टोळी विरोधी पथकातील सपोनि प्रशांत गिते, पोउनि संतोष मनवर यांच्यासह पथकातील कर्मचाऱ्यांनी गोदामातून १४ जनावरे किंमत ८१ हजार रुपयांची सुटका केली. 
 
बातम्या आणखी आहेत...