आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडकरींच्या झपाट्याने ‘नमामि गंगा’चे गढूळ पाणी निघाले ढवळून

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर-केंद्रीय जलसंपदा मंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवार, ३ सप्टेंबरला गडकरी वाड्यावर संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन माहिती घेतली. गडकरींच्या झपाट्यामुळे नमामि गंगा प्रकल्पाचे गढूळ पाणी ढवळून निघाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजेंड्यावरील हा सर्वात महत्त्वाचा प्रकल्प वेगाने पुढे नेण्यात उमा भारती यांना अपयश आल्याने जलसंपदा खाते संघाचे लाडके असलेल्या गडकरींना देण्यात आले आहे. 

पाच राज्यांतून जाणारी गंगा २५२५ किमीचा प्रवास करते. देशातील ४६ टक्के जनता गंगेच्या किनारपट्टीवर राहते. नमामि गंगे प्रकल्पाच्या २०१४-१५ ते २०१६-१७ या पहिल्या तीन वर्षांत ३६७३ कोटी रुपये खर्च करण्यात आले. २०१७-१८ या वर्षासाठी २३०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, उमा भारती यांच्याकडे मंत्रालय असताना त्यांना अपेक्षित कामाचा वेग गाठता आला नाही. निविदेला लागणाला विलंब, भूसंपादनातील अडथळे, कायदेविषयक प्रकरणे, राज्य सरकारांकडून होणारा उशीर आदी प्रकल्प धिम्या गतीने सुरू असल्याची कारणे असल्याचे गडकरींना सांगण्यात आल्याचे समजते. गंगेतील जैवविविधतेचे संरक्षण व संगोपन, भूजलाचे पुनर्भरण, नदी संवर्धनासाठी नागरिकांची जबाबदारी निश्चित करणे आदी लक्ष्य या बैठकीत ठरवण्यात आल्याचे समजते. 

नदी किनारा विकास, मलनिस्सारण वाहिन्या, घाटांची स्वच्छता आदींबाबत िनतीन गडकरी यांनी माहिती घेऊन अधिकाऱ्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले. “नमामि गंगे’ प्रकल्पासाठी स्थापन केलेल्या तांत्रिक समितीची बैठक लवकरच बोलावल्या जाईल, असेही सूत्रांनी सांगितले आहे. 
 
उमा भारती संघाच्या परीक्षेत नापास   
जलसंपदा खाते असताना उमा भारती वारंवार नागपूरला येऊन संघ मुख्यालयात हजेरी लावायच्या. संघाच्या गुडबुक्समध्ये राहण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. पण, गंगा स्वच्छता अभियान ढेपाळल्याने त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. संघाच्या परीक्षेत उमा भारती नापास झाल्याने त्यांचे खाते मेरिट येणारे गडकरी यांना देण्यात आल्याचे बोलले जाते.
बातम्या आणखी आहेत...