आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अार्थिक विवंचनेतून चव्हाण कुटुंबियांची अात्महत्या?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंजनगाव सुर्जी- अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील किराणा दुकानदार प्रफुल्ल नारायणसा चव्हाण यांच्यासह कुटुंबातील सहा सदस्यांनी मंगळवारी विष घेऊन अात्महत्या केली हाेती. त्यांच्या अात्महत्येचे नेमके कारण अजून स्पष्ट झाले नसले तरी अार्थिक विवंचनेतून त्यांनी हे टाेकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त हाेत अाहे. दरम्यान, सर्व मृतदेहांवर मंगळवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात अाले त्यांचे व्हिसेरा तपासणीसाठी प्रयाेगशाळेत पाठवण्यात अाला अाहे. प्रफुल्ल यांच्यासह विवेक नारायणसा चव्हाण (३५), मंगला नारायणसा चव्हाण (४०), लक्ष्मी नारायणसा चव्हाण (३८), भाची कामिनी अरुणसा बारड (२०) रोशनी अरूणसा बारड (१८) यांचा मृतांमध्ये समवेश अाहे. यापैकी विवेका हा मनोरुग्ण होता. त्याच्यासह सर्व सदस्य अविवाहित होते. चव्हाण कुटुंबियांकडे एक एकर शेती असून ती भाडेतत्त्वावर दिल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. जिल्हाधिकाऱ्यांसह पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट दिली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फरवली. मात्र अद्यापही आत्महत्येचे गूढ उकलण्यात यश आले नाही.
बातम्या आणखी आहेत...