आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागपूरात मारहाण झालेल्या भाजपच्या नेत्याजवळ होते बैलाचे मांस, रासायनिक परीक्षण अहवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नागपूर- गोमांस बाळगल्याच्या संशयावरून नागपूर जिल्ह्यात काटोल तालुक्यातील भारसिंगी गावात भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या माजी तालुका उपाध्यक्ष सलीम इस्माईल शाह यांना बेदम मारहाण केल्याच्या घटनेला कलाटणी मिळाली आहे. शाह यांच्याकडे सापडलेले मांस हे बैलाचे असल्याचा अहवाल रासायनिक प्रयोगशाळेने पोलिसांना दिला असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे, हा  अहवाल आलेला नसल्याचा दावा करत पोलिसांनी त्यास दुजोरा देण्यास नकार दिल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. राज्यात गोवंश हत्याबंदीचा कायदा लागू असून त्यात बैलाचाही समावेश होतो. न्यायसहायक प्रयोगशाळेच्या अहवालात ते 
 
बैलाचे मांस होते, असा निर्वाळा दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, नागपूर ग्रामीण पोलिस त्याला दुजोरा द्यायला तयार नाहीत. जलालखेडा पोलिस ठाण्याचे ठाणेदार तिवारी यांनी यासंदर्भातील अहवालच मिळाला नसल्याचा दावा केला. एका अधिकाऱ्याने शाहांनी घटनेच्या दिवशीच पोलिसांना आपण बैलाचे मांस बाळगल्याची कबुली दिली होती, असा दावा केला आहे. 
 
अहवालामुळे भाजपची पंचाईत
या घटनेने भाजपची मात्र पंचाईत झाली आहे. नागपूर ग्रामीणचे भाजपाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांनी एका वाहिनीशी बोलताना सलीम इस्माईल यांच्यावर पक्षाकडून तडकाफडकी कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.