आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहान मुलांचे रिअॅलिटी शो बंद झाले पाहिजेत, ...म्हणून गजलचे रिमिक्स होऊ शकत नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - सध्या हिंदी व मराठीच्या सर्व वाहिन्यांवर लहान मुलांच्या रिअॅलिटी-शोचे पिक आले आहे. गाणे, नृत्य, अभिनयासह विविध साहसी खेळांचा यात समावेश आहे. त्यातही गाण्यांचे  
रिअॅलिटी-शो अधिक आहे. या शोमुळे एका रात्रीतून स्टार झाल्यामुळे मुलांचे शिकणे थांबते. लहान वयात मुलांना भरकटवणारे हे रिअॅलिटी-शो बंदच झाले पाहिजे, असे स्पष्ट मत सुप्रसिद्ध गायक रूपकुमार राठोड यांनी येथे व्यक्त केले. एका स्थानिक कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
 
रिअॅलिटी-शोमुळे यशाची शिडी गाठणे खूपच सोपे झाले आहे. मुले रातोरात स्टार होतात, त्यांना संपूर्ण देश ओळखायला लागतो. त्यामुळे मुलांची नवे काही शिकण्याची आणि आत्मसात करण्याची प्रक्रिया थांबते. संघर्षांनंतर मिळणारे यश दीर्घकाळ टिकणारे असते तर रिअॅलिटी-शोमधून मिळणारे यश, पैसा व प्रसिद्धी अल्पकाळ टिकणारे असते, हे या मुलांना समजावून सांगितले पाहिजे, असे राठोड म्हणाले. 
 
मुलांना भावनात्मक आणि शारीरिकदृष्ट्या हे कार्यक्रम उद्ध्वस्त करतातच, पण कमी वयात त्यांची निरागसताही हरवते, हे शो मुलांना भावनात्मकदृष्ट्या उद्ध्वस्त करत आहेत आणि त्यांची शुद्धता संपवते. काही वर्षांपूर्वी ईटीव्ही बांगलाच्या एका लहान मुलांच्या स्पर्धात्मक कार्यक्रमात परीक्षक रागावल्याने एका मुलीला धक्का बसला होता. जून्या गाण्यांचे रिमिक्स होणे वाईट नाही. रिमिक्समुळे जूनी गाणी नव्या पिढीपर्यत पोहोचतात. फक्त त्याचे व्हीडीओ अश्लिल असतात. ते थांबले पाहिजे, असे राठोड म्हणाले. एका रात्रीतून मिळणाऱ्या यशाने हुरळून न जाता नव्या मुलांनी साधना आणि रियाजावर भर दिला पाहिजे. याच कारणास्तव माझ्या मुलीला आम्ही ठरवून रिअॅलिटी-शोपासून दूर ठेवले, असे ते म्हणाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...