आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज, भ्रूण हत्या थांबवण्यासाठी घेतली शपथ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्णी - छत्रपती शिवाजी महाराजांसारखे योद्धा जन्माला घालण्यासाठी आधी जिजाऊ माता जन्माला येण्याची आवश्यकता आहे. जिजाऊ मातेची पोटातच हत्या होत असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा योद्धा कसे जन्माला येईल, असे मत आर्णी दिवाणी फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते तालुक्यातील सुकळी येथील माध्यमिक विद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने आयोजित कायदे विषयक मार्गदर्शन शिबिरात बोलत होते. 
 
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आर्णी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय खंदाडे,अॅड,प्रमोद चौधरी,अॅड,अनुपम भगत, अॅड. एम. डी. चव्हाण,अॅड. मुंडे, विस्तार अधिकारी किशोर रावते,सरपंच सुभाष जाधव,पोलिस पाटील शिवाजी जाधव आणि शाळेचे मुख्याध्यापक अरूण उके उपस्थिती होते.
 
यावेळी न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी पुढे म्हणाले की,स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी समाजात जनजागृती करून मानसिकता बदलण्याची गरज आहे.स्त्रीभ्रूण हत्या होणार नाही याची सुरूवात स्वःपासून करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
 
दैनंदिन जीवनात आत्मसन्मान जपण्यासाठी स्त्रीने अधिक सजग सक्षमपणे वावरण्याची गरज आहे.यासाठी स्वःच्या वागण्यात आवश्यक खंबीरपणा आणला पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी केले.ग्रामीण भागातील स्त्रीयांनी आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती च्या जोरावर उद्योगधंदे उभारून प्रगती केली पाहिजे. बळाच्या जोरावर अनेकांनी यशाचे शिखर गाठले असून महिलांनी सुध्दा उद्योगधंदे करण्यासाठी पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांनी केले. 
 
महिला सुरक्षेबाबतचे कायदे नियमांबद्दल माहिती अॅड. प्रमोद चौधरी यांनी दिली. यावेळी शाळेच्या शिक्षिका सरोजिनी चालिकवार, सुधीर बनसोड, उमेश निमकर, प्रकाश जाधव, देवीदास आडे, बाबाराव राठोड हे उपस्थिती होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देवानंद जाधव यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला विद्यार्थी विद्यार्थीनी सह गावांतील नागरिकांची गर्दी होती. 
 
सुकळी वासियांनी घेतली शपथ 
सुकळी येथे आयोजित कायदे विषयक शिबिरात गावातील नागरिकांनी न्यायाधीश चैतन्य कुलकर्णी यांच्या उपस्थितीत यापुढे गावात स्त्रीभ्रूण हत्या थांबविण्यासाठी शपथ घेऊन एकच निर्धार केला.
 
निष्काळजीपणे वाहन चालवू नका 

-विद्यार्थ्यांनी वाहन चालवतांना सावधगिरी बाळगून वाहन चालवावे. जीवाची किंमत ओळखून वाहन चालविण्याची गरज असून प्रवाशांनी सुध्दा जपून प्रवास केला पाहिजे. सुकळी परिसरातून नागपुर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग गेल्याने अपघातांचे प्रमाण वाढत चालले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...