आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

4 दिवसांत स्त्री जातीचे 2 अर्भक सापडले; एकाचे कुत्र्याने तोडले लचके, दुसरे कचरा कुंडीत आढळले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- शहरातील खापर्डे बगिचा परिसरात असलेल्या एका सार्वजनिक कचरा पेटीमध्ये सोमवारी (दि. १) काही नागरिकांना एक अर्भक दिसले. ही माहिती कोतवाली पोलिसांना देण्यात आली.पोलिसांनी येवून अर्भक बाहेर काढले व त्याची पाहणी केली असता ते स्त्री जातीचे मृत अर्भक असल्याचे पुढे आले . दरम्यान चार दिवसांपुर्वी हिंदू स्मशान भूमीसमोरही स्त्री जातीचे एक मृत अर्भक आढळले होते. या अर्भकाचे श्वानांनी लचकेसुध्दा तोडले होते. एकाच आठवड्यात दोन ठिकाणी स्त्री जातीचे अर्भक आढळून आल्यामुळे  पोलिसांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

खापर्डे बगिच्यामधील कचरा पेटीत आढळलेले हे मृत अर्भक स्त्री जातीचे असून सहा ते सात महिन्यांचा तो गर्भ असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या गर्भाला हात, पाय, चेहरा व इतरही अवयव आले होते. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञाताविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. मात्र अर्भक कोणी व का टाकले, याबाबत पेालिसांनी तपास सुरू केला आहे. हे अर्भक  स्त्री जातीचे व सहा ते सात महिने पूर्ण झालेले  असल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. यावेळी या कचरा पेटीजवळ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.शहरातील हिंदू स्मशान भूमीसमोरही चार दिवसांपूर्वी असेच अर्भक आढळून आले होते. या बाबीकडे  पोलिसांनी गांभिर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...