आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुकानदारांकडून करवून घेतली साफसफाई!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - रस्त्यावर कचरा फेकणारे दुकानदार, फळविक्रेत्यांकडून महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी स्वच्छता करवून घेतली. शहराच्या विविध भागात पाहणी करीत रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांवर फौजदारी करण्याचे आदेश आयुक्तांनी आज (१२जुलै) दिले. 
 
स्थानिक जवाहर गेट, इतवारा बाजार, मालवीय चौक, कृषी उत्पन्न बाजार समिती परीसर, अमरावती मॉडेल रेल्वे स्थानक रोड, राजापेठ भाजीमंडी यासह विविध परिसराची पाहणी केली. पाहणी करण्यात आलेल्या या परिसरात भाजीपाला तसेच फळविक्रेत्यांची दुकाने मोठ्या प्रमाणात आहे. बाजारपेठ असल्याने विक्रेते खराब झालेला भाजीपाला, फळे तसेच अन्य साहित्य इतरत्र फेकत असल्याचे दिसून येते. त्यामुळे हा परिसर नेहमी अस्वच्छतेच्या विळख्यात असल्याचे दिसून येतो. नागरिकांच्या आरोग्याशी निगडीत असल्याने महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष देत आयुक्तांनी भाजीपाला, फळविक्रेता, हॉकर्स तसेच दुकानदारांना खडेबोल सुनावले. या परिसरात नाल्या फळाच्या कचऱ्याने भरुन आढळून आल्याने आयुक्त चांगलेच संतप्त झाले. त्यामुळे कचरा करणाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. इतवारा बाजार परिसरात अतिरिक्त कामगार लावून नाल्यांची सफाई करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. राजापेठ मंडी परिसरात अनेक भाजी विक्रेत्यांनी खराब झालेला भाजीपाला रस्त्यावर टाकल्याचे आढळून आले. या सर्वांना सक्तीची ताकीद देण्यात आली तसेच कचरा हा कचरा पेटीत टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी उपायुक्त नरेंद्र वानखडे, अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे, सहाय्यक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अजय जाधव, जनसंपर्क अधिकारी भूषण पुसतकर उपस्थित होते. आयुक्तांच्या भेटीमुळे कचरा रस्त्यांवर टाकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. 

अमरावती। इतवारा बाजारात भाजीपाला सडलेली फळे नालीत फेकून अस्वच्छता करणाऱ्या मोहम्मद जफर, कुनाल आठवले विजय काटोलकर या तीन विक्रेत्यांवर बुधवारी (दि. १२) सिटी कोतवाली पोिलस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. 
 
बातम्या आणखी आहेत...