आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचा ताफा गेला कच्च्या रस्त्यातून आणि राँग साइडने!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- मुख्यमं त्रीदेवेंद्र फडणवीस शुक्रवार, जानेवारी रोजी शहरात आले होते. डाॅ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनीचा कार्यक्रम आटोपून मुख्यमंत्र्यांना मुंबईला परत जायचे होते. या वेळी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार त्यांचा ताफा ज्या मार्गाने जाणे अपेक्षित होता, त्या मार्गाने जाता अक्षरश: १०० ते २०० मीटर कच्च्या रस्त्यातून आणि एक्स्प्रेस हायवेसारख्या मार्गावरून राँग साइड नेण्यात आला आहे. हा अतिशय गंभीर प्रकार असून, या प्रकारे शहराच्या पोलिस वर्तुळासह सर्वत्र खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री येण्यापूर्वीच त्यांच्या कार्यक्रम स्थळांची आणि कार्यक्रम स्थळांवर पोहोचण्याचे प्रवासाचे मार्ग ठरले असतात. ठरल्याप्रमाणे मुख्यमंत्री शुक्रवारी सकाळी शहरात आले. त्यांनी तीन कार्यक्रम आटोपले. शेवटचा कार्यक्रम हा डाॅ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनीचा होता. हा कार्यक्रम आटोपून नियोजित मार्गाप्रमाणे त्यांचा ताफा प्रबोधिनी, बियाणी चौक, वेलकम पॉइंट, गौरी इन या ठिकाणाहून एक्स्प्रेस हायवेने बडनेराच्या दिशेने बेलोरा विमानतळ जाणे अपेक्षित होता. मात्र, प्रबोधिनीचा कार्यक्रम आटोपला.

प्रबोधिनीपासून जवळपास १०० ते २०० मीटर अंतर कच्चा रस्ता पार करून हा ताफा थेट एक्स्प्रेस हायवेवर आला. मात्र, एक्स्प्रेस हायवेवरून काही अंतर राँग साइड चालावे लागले, त्यानंतर रस्त्याला जंक्चर आहे, त्या जंक्चरवरून मुख्यमंत्र्यांचा ताफा सरळ मार्गावर आला. अचानकपणे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा मार्ग बदल झाल्यामुळे ताफ्यातील पोलिसही चक्रावले होते. कारण मुख्यमंत्र्यांचा ताफा एक्स्प्रेस हायवेसारख्या मार्गावर राँग साइड चालणार असल्यामुळे पोलिसांनी काही वेळासाठी नागपूरवरून अकोल्याकडे आणि अकोल्याकडून नागपूरकडे जाणारी दाेन्ही मार्गांची वाहतूक थांबवली होती, अशी विश्वसनीय माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा मार्ग सुरक्षेच्या कारणावरून ऐनवेळी बदलवण्यात आला किंवा कुणाची चूक झाली. त्यामुळे हा ताफा मार्गबदल करून गेला. याबाबत मात्र, शुक्रवारी रात्रीपर्यंत काही समजले नव्हते. यासंदर्भात पोलिस खात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ताफा मार्ग बदलवून गेल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, हा निर्णय वेळ वाचवण्यासाठी घेण्यात आला असावा, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे.