आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व मुलींचे एकत्रित विवाह, ४४ वर्षांमध्ये निवडणुकीला फाटा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महागाव- कमी खर्च, कमी कष्ट आणि वेळेची बचत करणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना आज समाजमान्य झाली आहे. मात्र, १०० टक्के आदिवासी समाजाचे वास्तव्य असलेल्या तालुक्यातील बिजोरा या छोट्याशा गावामध्ये मुलींच्या सामूहिक विवाहाची ही प्रथा अनेक पिढ्यांपासून जोपासल्या जात असून येथील बहुतांश मुलींची लग्ने येथे एकत्रितरीत्याच झाली असून असाच एक १३ जोडप्यांचा सामूहिक विवाह २६ रोजी होणार आहे.

महागाव तालुक्यातील बिजोरा हे गाव नागपूर-तुळजापूर हायवेला लागून असून या ठिकाणी १०० टक्के आदिवासी समाजाचे लोक राहतात. पांढरपेशा समाजाने आदर्श घ्यावा, असे काही निर्णय त्यांनी घेतले आहेत. या गावात अनेक पिढ्यांपासून कुणाच्याही घरी लग्न झालेले नाही. म्हणजे जर मुलांचे लग्न असेल, तर ते बाहेरगावीच होतात. परंतु, बहुतांश मुलींचे लग्न हे गावात एकत्रित राहूनच दरवर्षी एकाच मांडवाखाली थोड्याफार खर्चात समाजाच्या चालीरीतीप्रमाणे पार पडतात. पिढ्यानपिढ्या ही परंपरा चालत आलेली आहे आता ही २६ एप्रिल रोजी जवळपास १३ जोडप्यांचा विवाह होणार आहे, असे हे आदर्श गाव असून दुसऱ्या बाबतीतही तसेच आहे. १५०० लोकसंख्या असलेले हे गाव तिथे एकूण मतदारांची संख्या ८५० आहे ग्रामपंचायत सदस्य संख्या आहे.
ग्रामपंचायत सन १९६२ साली अस्तित्वात आल्यानंतरच्या काळापासून गावात दोन गट आहेत. परंतु, १९७२ पासून ते २०१६ आजपर्यंत ४४ वर्षांच्या काळात एकवेळही निवडणूक झालेली नाही हे विशेष. बिजोरा या गावचे पहिले सरपंच म्हणून डुबाजी गंगाराम काळे हे होते. त्यानंतर देवराव लक्ष्मण वानोळे यांनी तीन वेळा सरपंच म्हणून गावचा कारभार पाहिला आणि मग केशव मानतुटे, शंकर मानतुटे, श्यामराव यादव वानोळे, कामराव मानतुटे, उकंडराव गोविंदा वानोळे, वच्छालाबाई मानतुटे, सदाशिव वानोळे आणि आता सध्या प्रभाकर मारोती राजने हे सरपंच आहेत. गावचा कारभार सध्या देवराव वानोळे, देवीदास मोहकर, संभाजी मुरमुरे हे पाहत असून, याही पुढे गाव कसे आदर्श ठेवता येईल याचेच प्रयत्न राहणार असल्याचे ते सांगतात.
आदिवासी समाज हा निसर्गाच्या जास्त जवळ राहत असल्याने त्यांच्या प्रथा, परंपरा ह्या आधुनिक युगामध्येही आपले वैशिष्ट्ये राखून असल्याचे दिसून येते.

गावात एकत्रित विवाह
आमच्यापूर्वजांपासूनगावात एकत्रित विवाह साजरे करण्याची पद्धत आजपर्यंत चालत आलेली आहे गावात आम्ही १०० आदिवासी समाज असल्यामुळे ग्रामपंचायतची निवडणूक ही पूर्वीसारखीच यापुढेही अविरोध करू. या दोन्ही गोष्टींमुळे वेळेचे पैशांची बचत होते गावातील एकमेकांविषयी प्रेम, जिव्हाळा सलोखा कायम राहतो. देवीदास मोहकर, माजीजि. प. सदस्य