आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आपले सरकार’वर अद्यावत संगणकीकृत 7/12, ‘ई-चावडी ई-फेरफार’ उपक्रमांतर्गत संगणकीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाशीम - महाराष्ट्र शासनाच्या महात्वाकांक्षी उपक्रम असलेल्या, ई-चावडी ई-फेरफार उपक्रमांतर्गत हस्तलिखित ७/१२ चे संगणकीकरण करण्यात आले आहे. याचा महत्वाचा उदेश म्हणेजेच जनतेला ७/१२ नमुना,आठ अ प्राप्त करणे बाबत होणारा त्रास आणि वेळ वाचविणे होय. अद्यापपर्यंत जनतेला संगणकीकृत ७/१२ ची प्रत mahabhulekh.maharashtra.gov.in या वेबसाइटवरुन प्राप्त होत होती आणि पुढेही मिळेल.
 
 परंतु सदरहू ७/१२ प्रतीवर सर्वात खाली एक संदेश देण्यात आला आहे,की सदरहू ७/१२ हा कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर  बाबीकरिता वापरता येणार नाही. त्या मुळे जनतेला बरेच समस्या निर्माण होत असून, त्रास सहन करावा लागत आहे. त्या करिता शासनाने सदर संगणकीकृत ७/१२ मिळण्याकरिता ‘आपले सरकार’ पोर्टल  वर सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
 
 या पोर्टल वर जनतेला डिजिटल ७/१२ मिळणार आहे. त्या ७/१२ प्रतीवर तलाठी यांच्या सही, शिक्क्याची आवश्यकता नाही आणि हा ७/१२ नागरिक कोठेही वापरु शकतील. या सुविधेसंबमधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सर्व बँक, दुय्यम निबंधक कार्यालय, तहसील कार्यालय व इतर सर्व संबधितांना कळविण्यात आले आहे. या साठी पुढील पद्धती वापरुन आपण आपले सरकार पोर्टलद्वारे ७/ १२ प्राप्त करु शकता.
 
असा करा आपल सरकार पोर्टलद्वारे ७/ १२ प्राप्त : आपले सरकार पोर्टल वरुन ७/१२ ची प्रत मिळण्याकरिता नागरिकांना aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर जाऊन Right to services हा पर्याय निवडावा ,त्या नंतर पर्याय क्र.१ निवडून New user registrarion तयार करावे लागेल. 
 
त्यासाठी आधार नंबर हा मोबाईल क्रमांकासोबत लिंक असणे आवश्यक आहे. त्या नंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर  OTP (one Time Passward) वापरुन नवीन खाते तयार होईल. त्या मध्ये विचारलेली माहिती भरुन आपले खाते तयार करावे, खाते तयार झाल्यानंतर ‘युजर आयडी’ आणि ‘पासवर्ड’ वापरुन ‘लॉग इन’ केल्यानंतर अनेक विभागाच्या सेवांची यादी दिसेल.
 
त्या मध्ये भूमी अभिलेख विभाग निवडून ७/१२ ची सेवा निवडावी आणि आपला गट नंबर ,सर्व्हे नंबर टाकून ७/१२ प्राप्त कराता येईल, तसेच एका प्रती करिता २३ रुपये शुल्क नागरिकांना नेट बँकिगद्वारे अदा करावे लागेल.
बातम्या आणखी आहेत...