आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम परवानगी फाईल्स मंजूरीची आता ‘एसएमएस’द्वारे माहिती !

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - बांधकाम परवानगी प्रकरण मंजुरीची माहिती आता मोबाइलवर एसएमएसद्वारे मिळणार आहे. महापालिकेच्या सहाय्यक संचालक नगर विभागातील ऑटो डिसीआर प्रणालीमध्ये ऑटोमॅटीक एसएमएसची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. एसएमएस सुविधेमुळे नागरिकांना त्यांच्या बांधकाम परवानगी प्रकरणाची नेमकी स्थिती कळण्यास मदत मिळणार आहे. 
 
शहरात इमारतीचे बांधकाम करण्याची परवानगी महापालिकेच्या सहाय्यक संचालक नगर रचना विभागाकडून दिली जाते. सहाय्यक संचालक नगर विभागाची किचकट प्रक्रिया असल्याने अनेकजण परवानगी घेताच इमारतीचे बांधकाम करीत असल्याची बाब समोर आली. बांधकाम परवानगी घेता अवैधपणे इमारतींचे बांधकाम करण्याचे प्रमाणात वाढ होत होती, शिवाय महापालिकेचे देखील उत्पन्न बुडत होते. उत्पन्नाची बाब लक्षात घेता बांधकाम परवानगी देण्याची प्रक्रिया सुविधाजनक करण्याचा प्रयत्न महापालिकेच्या एडीटीपी विभागाकडून करण्यात आला. याकरीता सहा ते सात वर्षांपूर्वी एडीटीपी विभागाने इमारत बांधकाम परवानगी देण्याकरीता ऑटो डिसीआर प्रणाली सुरू केली. या प्रणालीमुळे नागरिकांना जलद गतीने बांधकाम परवानगी मिळण्यास मदत झाली. इमारत बांधकाम परवानगीसाठी दाखल करण्यात आलेल्या एका फाईल्सचा प्रवास एडीटीपी विभागात अनेक टेबलवर होतो. मुख्य कार्यालयातील सुविधा केंद्रात ऑटो डिसीआर प्रणालीमध्ये सर्वप्रथम फाईल्सची नोंद घेतली जाते. त्यानंतर संबंधित अभियंता, नकाशा तांत्रिक मंजूरी, प्रत्यक्ष पाहणी अश्या विविध टप्पे पार केल्यानंतर बांधकाम परवानगीला मंजूरी दिली जाते. फाईल नेमकी कोणाकडे आहे. प्रकरणाला मंजूरी मिळाली किंवा नाही, किती प्रकरणे प्रलंबित आहे. असे अनेक प्रश्न इमारतीचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांना पडतात. 

एसएमएस अलर्ट 
^महापालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगीस मंजूरी मिळाली अश्या आशयाचा मोबाइलवर संदेश पाठविण्याची सुविधा आरंभ केली आहे. बांधकाम परवानगीची माहिती देणारी ही चांगली सुविधा आहे. ’’ सुरेंद्रकांबळे, सहाय्यक संचालक नगर रचना 
असा मिळेल एसएमएस अलर्ट : फाईलदाखल केल्यानंतर प्रकरणाला विशिष्ट क्रमांक दिला जातो. संबंधित प्लॉट क्रमांक, सर्व्हे क्रमांक, मौजा आदी विविध स्वरुपाची माहिती असलेले प्रकरण मंजूर करण्यात आले अाहे, अशी माहिती एसएमएसच्या माध्यमातून दिली जाते. 
अमरावती महापालिकेतील ऑटो डीसीआर प्रणाली. 
 
बातम्या आणखी आहेत...