आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘राशी 658’ वाणावर बंदी; 226 शेतकऱ्यांना 36 लाखांची भरपाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- मराठवाड्यातील शेतकऱ्यांना कापसाचे सदोष बियाणे विकल्याबद्दल राशी सीड््स कंपनीच्या ‘राशी-६५८’ या वाणावर राज्याच्या कृषी खात्याने बंदी घातली आहे. राज्याचे कृषी संचालक (निविष्ठा व गुणवत्ता नियंत्रण) विजयकुमार इंगळे यांनी हे आदेश काढले आहेत. त्याचबरोबर २२६ शेतकऱ्यांना ३६ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश कृषी संचालकांनी दिले आहेत.   

राशी कंपनीच्या ‘राशी-६५८’ व  ‘बीजी-२’ या वाणाला शेतकऱ्यांकडून खूप मागणी आहे. भरघोस उत्पन्न देणाऱ्या या वाणावर बंदी घालताना कृषी खात्याला बरीच कसरत करावी लागली. एकाच भागात नव्हे, तर २२६ शेतकऱ्यांना कंपनीच्या सदोष वाणाचा फटका बसला. जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्यांनी या वाणाची लागवड केली असता त्यावर शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर २२६ शेतकऱ्यांचे नुकसान  झाले. त्यामुळे राशी कंपनीने महिनाभराच्या आत या शेतकऱ्यांना ३६ लाख ८६ हजारांची नुकसान भरपाई द्यावी. ही भरपाई वेळेत न दिल्यास २४ टक्के दराने व्याज आकारले जाईल, असे आदेश इंगळे यांनी काढले आहेत. 
बातम्या आणखी आहेत...