आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधसंकलनातून नव्या रोजगाराची निर्मिती, आदिवासींना रोजगारक्षम बनवणार...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चिखलदरा- अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे सुरू झालेल्या मधसंकलन केंद्रामुळे स्थानिक अादिवासी बांधवांना रोजगाराचे एक प्रमुख साधन उपलब्ध झाले आहे. मेळघाट आणि आजुबाजूच्या जंगल परिसरातील वनसंपत्तीचे जतन, निसर्गातील मधमाशांचे संवर्धन आणि स्थानिक आदिवासीना रोजगार उपलब्ध होण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळांतर्गत मधसंचालनाय महाबळेश्वर यांच्यामार्फत विदर्भस्तरीय मध संकलन प्रक्रिया केंद्र’ चिखलदरा येथे सुरु करण्यात आले आहे. स्थानिक सिपना महाविद्यालयाच्या सहकार्याने खादी ग्रामोद्योग मंडळाने हे मधसंकलन केंद्र सुरू केले आहे.
 
सिपना शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे अध्यक्ष जगदीश गुप्ता यांच्या संकल्पनेतून मागील सहा वर्षांपासून महाविद्यालयात मधसंकलन करून प्रक्रिया करण्यात येते. मेळघाटातील चिखलदरा धारणी तालुक्यात तसेच विदर्भातील अकोला, यवतमाळ,चंद्रपूर,गोदिया,गडचिरोली इत्यादी जिल्ह्राांच्या जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात आग्या मधमाशांच्या वसाहती आढळून येतात. या वसाहतीपासून स्थानिक लोक पारंपरिक पद्धतीने मधसंकलन करीत असून, या पारंपरिक पद्धतीमुळे निसर्गातील मधमाशाचा नाश होऊन मधाचा दर्जासुद्धा खालावत आहे. 

या सर्व स्थानिक आदिवासी इतर लोकांना आग्या मधमाशांच्या वसाहतीपासून शास्त्रोक्त पद्धतीने मध काढण्याचे प्रशिक्षण देऊन त्यांनी काढलेला मध संकलित करणे, त्यावर प्रक्रिया करणे बॉटलिंग करुन खादी ग्रामोद्योग मंडळाच्या देखरेखीत विक्री करण्याचे नियोजन चिखलदरा येथील सिपना कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सहकार्याने केले जाणार आहे. 
 
पुढील स्लाईडवर वाचा-
आदिवासींना रोजगारक्षम बनवणार... 
चिखलदऱ्याचे घनदाट जंगल ठरतेय उपयुक्त ... 
मधपाळ शेतकऱ्यांसाठी हे केंद्र ठरणार सोयीचे... 
बातम्या आणखी आहेत...