आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या आणाभाका एकीसोबत गाठ दुसरीसोबत, बोहल्यावर चढण्यापुर्वीच पोलिस नवरदेव पोहोचला कोठडीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
अमरावती - शहरातील एका सत्तावीस वर्षीय पोलिसाचे सोमवारी १७ एप्रिलला लग्न होते. त्यामुळे रविवारी १६ एप्रिलला हळदीचा कार्यक्रम होऊन लग्नाची तयारी सुरू झाली. मात्र लग्नाच्या आणाभाका एकीसोबत लग्नाची गाठ दुसरीसोबत बांधण्यासाठी निघालेल्या या नवरदेवाचा घाट लक्षात आल्यानंतर पीडित तरुणीच्या तक्रारीवरून या नवरदेवाला रविवारी रात्री अटक करून कोठडीत टाकले. दुसरीकडे बोहल्यावर चढण्यापुर्वीच नवरदेवाला अटक झाल्याच्या घटनेने वधू कडील मंडळींना आघात सोसावा लागला. 
 
व्यंकैय्यापुरातील भुषण जीवनराम नेमाडे (वय २७) हा अकोला पोलिस दलात माना पोलिस ठाण्यात कार्यरत आहे. २३ वर्षीय युवतीसोबत त्याचे प्रेम संबध होते. ते दोघे शेगाव, माना, शहरातही फिरण्यासाठी सोबत जात होते. आपण लग्न करू असेही आमिष भूषणने पीडित तरुणीला दिले होते. त्यामुळे लग्न भूषणशी होणार असल्याने तरुणीही बिनधास्त होती. त्यामुळेच भुषणने आपल्यावर अत्याचार केल्याचेही तीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटलेे. भुषण दुसऱ्या मुलीशी लग्न करणार याची तरुणीला कल्पनाही आली नाही. भूषणचे दुसऱ्या मुलीसोबत लग्न जुळले. त्याच्या कुटुंबीयांकडून तयारी सुरू झाली. भूषणच्या लग्नाची पत्रिका या तरुणीच्या हातात पडल्यानंतर तिच्या पायाखालची वाळू सरकली. सोमवारी १७ एप्रिलला धामणगाव रेल्वे येथे भुषणचा विवाह सोहळा होणार होता. त्यामुळे १६ एप्रिलला भूषणला हळद लागली. पीडित तरुणी १६ एप्रिलला फ्रेजरपुरा ठाण्यात पोहोचली. तीने फ्रेजरपुराचे ठाणेदार पंजाबराव वंजारी यांना हे प्रकरण सांगून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी पोलिस शिपाई भुषण नेमाडे विरुध्द अत्याचार, फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. दुसरीकडे सोमवारी लग्नाला जायचे म्हणून भूषणच्या घरी तयारी सुरू होती मात्र गुन्हा दाखल असल्याने पोलिसांनी रविवारी रात्री भूषणला अटक केली. त्यामुळे सोमवारी नवरदेव होवून बोहल्यावर चढणार असलेला भुषण सोमवारी कोठडीत हवा खात होता.भूषणचे लग्न धामणगाव रेल्वेत होणार होते. भूषणच्या वाग्दत्त वधूला, तिच्या कुटुंबियांना रविवारी रात्रीपर्यंत याची कल्पना नव्हती. सोमवारी नवरदेव येणार आणि विवाह होईल, त्यामुळे वधुपक्षाने तयारी सुरू केली होती. मात्र भूषणच्या नातेवाईकाचा वधुकडील मंडळींना सांगितले कि, भांडण झाले, त्यामुळे उद्या लग्नाला येण्यासाठी उशीर होईल. मात्र नेमकी परिस्थिती काय आहे, काय झाले, ते जाणून घेण्यासाठी वधुकडील मंडळी सोमवारी शहरात पोहोचले. त्यांनी फ्रेजरपुराचे ठाणेदार वंजारी यांची भेट घेऊन प्रकार जाणून घेतला. त्यावेळी त्यांना भूषणचे काय प्रकरण होते का अटक झाली, ही बाब समोर आली. 

तक्रारदारमुलीच्या भावाने केला सीपींना फोन : याप्रकरणात रविवारी फ्रेजरपुरा पोलिसांनी भुषणविरुध्द गुन्हा दाखल केला. त्याला पोलिसांनी अटक केली नाही, अशी माहीती फोन करून पिडीत मुलीच्या भावाने पोलिस आयुक्तांना दिली होती. फोनमुळे पोलिस आयुक्तांनाही हा गंभीर प्रकार माहिती झाला त्यांनी पोलिसांना भूषणच्या अटकेचे आदेश दिले. त्यामुळे रविवारी रात्री त्याला अटक केली. 

विवाह सोहळा हा मुलीच्या जीवनातील अविस्मरणीय आणि सुखद प्रसंग असतो. तसेच तीच्या कुटुंबियांसाठी तो महत्वाचा आणि आनंदाचा क्षण असताे. त्याचप्रमाणे भुषणची वाग्दत्त वधूसुद्धा नवीन आयुष्याचे स्वप्न रंगवत होती. हातावर मेहंदी काढली होती. मात्र अनपेक्षितपणे आलेल्या एका फोनने सर्व स्वप्न काही वेळासाठी मिटले. या धक्क्यामुळे ही वधू भोवळ येवून कोसळली तर तीचे पिता आजारी झाल्याची माहीती वधूकडून फ्रेजरपुरा पोलिसांना भेटण्यासाठी आलेल्या मंडळींनी पोलिसांना सांगितले. 

अकोला येथील ‘एसपीं’ना पाठवला अहवाल 
- एका युवतीच्या तक्रारीवरून पोलिस शिपाई असलेल्या भुषण नेमाडे विरुध्द बलात्कार फसवणुकीचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. या प्रकरणाबाबत अकोला पोलिस अधीक्षक यांना सविस्तर अहवाल पाठवला असून फोनव्दारे माहीती देण्यात आली आहे. पंजाबराववंजारी,ठाणेदार, फ्रेजरपुरा. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...