आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापूरात तुरीची विक्रमी आवक, तूर खरेदी केंद्र आता १५ मार्चनंतरही सुरू राहणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर येथील शासकीय खरेदी केंद्रावर अशी प्रकारे मोठ्या प्रमाणात तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत आहे. - Divya Marathi
दर्यापूर येथील शासकीय खरेदी केंद्रावर अशी प्रकारे मोठ्या प्रमाणात तूर मोजमापाच्या प्रतीक्षेत आहे.
दर्यापूर - बाजारात तुरीचे दर किमान साडे तीन हजार रुपयांपर्यंत कोसळले असताना सध्या शासकीय खरेदी केंद्रांवर मात्र हजार रुपये अशा हमीभावाने तुरीची खरेदी होत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. त्यामुळे येथील बाजार समितीत दररोज सरासरी ८०० क्विंटल तुरीची विक्री होत आहे.
 
शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळावा म्हणून दोन महिन्यापूर्वी २८ डिसेंबर रोजी दर्यापूर येथील बाजार समिती यार्डात नाफेड खरेदी विक्री संघाच्या वतीने तूर खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्रावर सुरुवातीला आवक कमी होती. परंतु सध्या बाजार समितीत खुल्या बाजारात तुरीचे दर हमीभावापेक्षा घसरल्याने या केंद्रावर प्रचंड तुरीची आवक होत आहे. या केंद्रावर २३ फेब्रुवारी पर्यंत १२ हजार ६५६ क्विंटल तुरीची विक्रमी खरेदी करण्यात आलेली आहे. 
यावर्षी परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने तुरीचे उत्पादन चांगले झाले आहे. तुरीचा माल शेतकऱ्यांच्या घरात येताच अचानक बाजारात तुरीचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. दरम्यान नाफेडच्यावतीने हजार ५० रूपये प्रति क्विंटल दर शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. नगदी पीक म्हणून अोळखल्या जाणाऱ्या कपाशी नंतरचे पीक म्हणून तुरीचे पीक घेण्यास खारपाणपट्ट्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पसंती दिली यंदाच्या खरीप हंगामात तालुक्यातील शेतकऱ्यांनी सुमारे हजार हेक्टरवर तुरीची लागवड केली होती. तुरीचे उत्पादनही समाधानकारक झाले. सद्यस्थितीत नाफेडच्या खरेदी केंद्रावर आधारभूत भाव मिळत असल्याने शेतकरी तुर मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी आणत आहे. सध्या बाराशे शेतकरी प्रतीक्षा यादीत असून अंदाजे ३५ हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांजवळ विक्रीसाठी यार्डावर पडून आहे. येथील खरेदी केंद्रावर दरदिवशी आठशे ते साडे आठशे क्विंटल होत आहे. तुरीचे माप करण्यासाठी येथील केंद्रावर दोन वजनकाटे होते. मात्र वाढती आवक लक्षात घेता मोजमाप लवकर व्हावे या दृष्टीने बाजार समितीच्या संचालक मंडळाने निर्णय घेवून दोन नविन चाळण्या आणण्यात आल्या असून सोमवारपासून (दि. २७) चार वजन काटे लावण्यात येतील असे सभापती बाबाराव बरवट यांनी जाहीर केले. 
 
तूर खरेदी केंद्र आता १५ मार्चनंतरही सुरू राहणार 
अमरावती - केंद्र शासनाने तूर खरेदी करीता ९० दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे. राज्यात तूर खरेदीचा हा कालावधी १५ मार्च पर्यंत आहे. त्यानंतरही केंद्र शासनाला खरेदी केंद्र सुरू ठेवण्याबाबत विनंती करण्यात येत असून ही खरेदी केंद्र १५ मार्च नंतरही सुरू राहणार आहेत. तरी शेतकऱ्यांनी एकाच वेळी गर्दी करु नये असे आवाहन पणन विभागाकडून करण्यात आले आहे. 
तूर खरेदीच्या संदर्भात पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी २२ फेब्रुवारी रोजी नाफेड, भारतीय अन्न महामंडळ वखार महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये यावर्षी चांगला पाऊस झाल्याने तुरीचे अपेक्षेपेक्षा जास्त उत्पादन झाले आहे त्यामुळे तूर खरेदीत वाढ होत आहे. तूर खरेदीकरीता आवश्यक असणारा बारदाना तसेच साठवणुकीसाठी आवश्यक असणारी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली. ज्या जिल्ह्यामध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात आहे त्या ठिकाणी वखार महामंडळाने पणन महासंघ, कॉटन फेडरेशन, जिल्हा पुरवठा अधिकारी, आदिवासी विकास महामंडळ, बाजार समिती, सहकारी संस्था, यांची गोदामे प्राधान्याने तूर साठवणूकीसाठी भाड्याने घ्यावीत. तसेच विशेष बाब म्हणून खाजगी गोदामे भाड्याने घेण्याबाबतचे निर्देश वखार महामंडळास देण्यात आले. 

वखार मंडळाने त्यांची उपलब्ध असणाऱ्या गोदामाची माहिती दिली सदरील गोदामाची मालाची साठवणूक करण्याकरीता नाफेडने ५० किलो मीटर पेक्षा जास्त अंतर वाहतूक करण्यास मान्यता द्यावी असे सांगितले. त्यानुसार केंद्र शासनाकडे राज्य शासनाकडून जास्तीची वाहतूक करण्यास मान्यता मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. 

केंद्र शासनास नाफेडने खरेदी केंद्रावर अतिरिक्त मनुष्यबळ बारदाना उपलब्ध करण्याबाबत कळविण्यात आले आहे. सध्या नाफेड इतर राज्यातून बारदाना उपलब्ध करुन देत आहे. केंद्र शासनाच्या भाव स्थिरता योजनेंतर्गत आधारभूत दराने राज्यात दिनांक १५ डिसेंबर पासून तुरीची खरेदी करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या पणन विभागाअंतर्गत पणन महासंघ, नाफेड भारतीय अन्न महामंडळ यांच्यावतीने तुरीची खरेदी करीत आहे. या व्यतिरिक्त राज्यामध्ये नाफेड भारतीय अन्न महामंडळाकडून व्हीसीएमएस कडून खरेदी करीत आहे. तसेच एसएफसी स्वतंत्रपणे शेतकरी मंडळामार्फत केंद्र शासनाच्या संरक्षित साठ्यामध्ये तुर खरेदी करीत आहे. पणन महासंघ, नाफेड, भारतीय अन्न महामंडळाच्या वतीने १२५ खरेदी केंद्रावर अनुक्रमे लाख ९६ हजार ७२३, ९६ हजार ११५ अशी एकूण लाख ९२ हजार ८३९ क्विंटल तुरीची खरेदी करण्यात आली ३५४.९९ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा करण्यात आले आहेत. 

१२ हजार ६५६ क्विंटल तुरीची खरेदी 
- खरेदी केंद्रावररोज आठशे क्विंटल तुरीची खरेदी होत आहे. वाढती आवक पुरेशा वजन काट्याअभावी शेतकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी सर्वानुमते निर्णय घेवून दोन नविन चाळण्या आणलेल्या आहेत. त्यामुळे आता मोजमाप लवकर होण्यास मदत होवून शेतकऱ्यांचा या पुढील त्रास वाचणार आहे.’’
-बाबाराव बरवट, सभापती कृ. उ. बा. स., दर्यापूर. 
बातम्या आणखी आहेत...