आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व उमेदवारांचे भाग्य आज होणार मतदान यंत्रामध्ये बंद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्हा परिषद ५५ गट आणि ११० पंचायत समिती गणाकरिता गुरूवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी सकाळपासून मतदान प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. दरम्यान, ३१९ गट, आणि ६०९ उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात बंद होणार आहे. मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी होणार आहे. 
 
जिल्हा परिषदेच्या ५५ गटासाठी ३१९, तर पंचायत समितीच्या ११० गणाकरिता ६०९, असे दोन्ही मिळून ९२८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यातील एकूण एक हजार ९२१ मतदान केंद्र आहेत. यात जवळपास ८४ मतदान केंद्र संवेदनशील आहे. 
 
यात प्रचार तोफा मंगळवार, दि. १४ फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास थंडावल्या आहेत. यंदा दोन दिवसांपूर्वीच प्रचारतोफा थंडावल्यामुळे पूढील दोन म्हणजे मतदानाच्या दिवसांपर्यंत मुक प्रचारांवरच अधिक भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील मतदान केंद्रावर कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांचा विशेष बंदोबस्त लावण्यात आला आहे. निवडणुकीची आचार संहिता जाहिर झाल्यापासून जिल्ह्यात २७ ठिकाणी नाकाबंदी पॉईंट निर्माण करण्यात आले. वाहनांची तपासणी करण्यासाठी विविध पथकाच्या वतीने करण्यात आली. यामध्ये २२ अधिकाऱ्यांसह ८४ कर्मचाऱ्यांना नाकाबंदीवर नेमणूक करण्यात आली होती. यंदा निवडणुकांच्या अनुषंगाने आयोगाने विविध प्रकारच्या सुचना केल्या आहेत. ह्या सूचनांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे निर्बंध लावण्यात आले आहे. या निर्बंधामुळे उमेदवारांना प्रचार करताना मोठा त्रास सहन करण्याची वेळ आली. एकंदरीत उमेदवारांचा प्रचार आता संपुष्टात आला असून, गुरूवार, दि. १६ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील एकूण ९२८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. 

उमेदवारांना ३० दिवसात सादर करावा लागणार निवडणुकीचा खर्च 
निवडणूकआयोगाने नव्याने काही नियम लागू केले आहे. यात उमेदवारांची माहिती मतदान केंद्राबाहेर लावण्यात येणार आहे. यात संपत्तीच्या माहितीसोबतच संबंधित उमेदवारांवर कोणते गुन्हे दाखल करण्यात आले आहे, याचीही माहिती फलकाद्वारे देण्यात येणार आहे. उमेदवारांना निवडणूक संपल्यापासून ३० दिवसांच्या आत तर पक्षांना ६० दिवसांच्या आत निवडणूक खर्च यंत्रणेस कळवावा लागणार आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येत आहे. या निवडणुकीत अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी प्रशासनातर्फे प्रयत्न करण्यात येत आहे. 

मतदानाच्या क्षेत्रात स्थानिक सुट्टी जाहीर 
जिल्ह्यातील १६ पंचायत समितीसाठी यात मतदान होणार आहे. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मतदानाच्या क्षेत्रासाठी स्थानिक सुट्टी जाहिर केली आहे. दिव्यांग, वृद्धांच्या मदतीसाठी विशेष व्यवस्था करणार आहे. मतदानोत्तर, जनमत चाचणीवरही निर्बंध घातले आहे. 

पथक संबंधित गावी झाले रवाना 
मतदानासाठी मतदान पथक संबंधित गावी रवाना झाले. यावर्षी प्रथमच उमेदवारांनी शपथपत्रात नमूद माहितीतून उमेदवारांची संपत्ती, दाखल गुन्ह्यांची माहिती फलकाद्वारे लावली आहे. यंदा पहिल्यांदाच उमेदवारांची माहिती मतदान केंद्राबाहेर लावणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...