आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीपीसी’वर 17 महिला विजयी, 15 पुरुष उमेदवारांनीही मारली बाजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचे नियोजन करण्याचा अधिकार असलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदासाठी झालेल्या निवणुकीत पुन्हा एकदा महिलांनी कर्तबगारी दाखवली असून एकूण ३२ उमेदवारांपैकी १७ महिला उमेदवार विजयी ठरल्या आहेत. तर १५ पुरुष उमेदवारांना विजयाची चव चाखता आली. उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे प्रत्यक्ष मतदान २६ जागांसाठीच झाले. महानगर पालिका मतदान क्षेत्रातून भाजपचे सर्वाधिक तर जिल्हा परिषद, नगर परिषद, संक्रमणकालीन मतदार क्षेत्रात काँग्रेस सहकारी पक्षांचे बळ वाढले आहे. 

जिल्हा परिषद मतदारसंघांतर्गत येणाऱ्या २० पैकी १० जागांवर काँग्रेस, जागांवर भाजप, एका जागेवर प्रहार, एका जागेवर लढा संघटना, एका जागेवर बसपा एका जागेवर शिवसेनेने ताबा मिळवला. मात्र ३२ जागांचा विचार करता जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगरपरिषद संक्रमणकालीन मतदान क्षेत्रात भाजप सहकारी पक्षांनी एकूण १७ जागा घेत मोठा पक्ष म्हणून स्थिती मजबूत केली. तर काँग्रेस सहकारी पक्षांना १५ जागा मिळाल्या. 
 
मंगळवारी (दि. १२ सप्टे.) सकाळी ते दु. १२ पर्यंत शासकीय तंत्रनिकेतनमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनात २६ जागांसाठी सिद्धभट्टी, बावणे, शिरभाते, इब्राहिम चौधरी, कानिचे, लोणकर, निर्भय जैन, येले, बक्षी, लंके, मालठाणे यांनी मतमोजणीत सहकार्य केले. सहकारी म्हणून माळवे, चेडे, पेशने, डांगे, नागदिवे, वानखेडे आणि डीपीओ काळे यांनीही मतमोजणीत योगदान दिले. 
 
रविवारी झालेल्या निवडणुकीत ९९.३२ टक्के मतदान झाले होते. .त्यामुळे या प्रतिष्ठेच्या निवडणुकीचे निकाल केव्हा येतात याकडेच सर्वांचे लक्ष लागले होते. ज्यांना मनपा जिल्हा परिषद समित्यांवर पद मिळाले नाही त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली. 
डीपीसीवर निवड झाल्यानंतर वैभव वानखडे यांचे जि.प. अध्यक्ष नितीन गोंडाने सभापती जयंत देशमुख यांनी स्वागत केले. 
बातम्या आणखी आहेत...