आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलास उजवणे, मानसिंहका यांना स्मिता स्मृती पुरस्कार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- विदर्भ गौरव प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी प्रतिभासंपन्न अभिनेत्री पद्मश्री स्व. स्मिता पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांची तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील मानसिंहका यांची निवड करण्यात आली आहे.

प्रतिष्ठानच्या वतीने सचिव डॉ. गिरीश गांधी यांनी गुरुवारी या पुरस्कारांची घोषणा केली. नागपूरकर असलेल्या डॉ. विलास उजवणे यांनी मुंबईत अभिनयाच्या क्षेत्रात आपल्या कलेचा ठसा उमटविला आहे. सुमारे शंभर मराठी तसेच हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय करणाऱ्या डॉ. उजवणे यांनी नाट्यक्षेत्र तसेच दूरचित्रवाणी मालिकांमध्येही अभिनयाने रसिकांची वाहवा मिळविली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील मानसिंहका यांनी देवलापार येथील गो विज्ञान अनुसंधान संस्थेच्या माध्यमातून कामगिरी बजावली आहे. गोवंश रक्षणासह गोअर्कापासून विविध औषधी तयार करण्याचा प्रकल्प त्यांच्याच मार्गदर्शनात सुरु आहे. रोख २१ हजार रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. १४ डिसेंबर रोजी स्मिता पाटील यांच्या स्मृतिदिनी नागपुरात पुरस्काराचे वितरण होईल.
बातम्या आणखी आहेत...