आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीत इर्वीन चौकात आंबेडकरांना सामुदायिक अभिवादन, 14 एप्रिलला सकाळी आयोजन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती येथे डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार परिषदेते माहिती देताना किशोर बोरकर. - Divya Marathi
अमरावती येथे डॉ. बाबासाहेब आबेडकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार परिषदेते माहिती देताना किशोर बोरकर.
अमरावती- भारतरत्नडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंती निमित्य स्थानिक इर्वीन चौक येथे १४ एप्रिल २०१७ ला सकाळी ९.३० वाजता सामुदायिक अभिवान सोहळ्याचे आयोजन केले जाणार असल्याची माहिती समन्वयक किशोर बोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 
अभिवादन सोहळ्याचे उद्घाटन पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्या हस्ते होणार असून, या वेळी हव्याप्र मंडळाचे सचिव पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, कमलताई गवई, खासदार आनंदराव अडसूळ, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅड. अरुण शेळके, आमदार डॉ. सुनील देशमुख, महापौर संजय नरवणे, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, यशवंतराव शेरेकर, माजी मंत्री सुरेंद्र भूयार, वसुधाताई देशमुख, जगदीश गुप्ता, माजी आमदार रावसाहेब शेखावत, सुलभाताइ खोडके, पुष्पाताई बोंडे, अनिल गोंडाणे, संजय बंड, विभागीय आयुक्त जे. पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, पाेलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, महापालिका आयुक्त हेमंत पवार, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी, दिलीप एडतकर, विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे आदी उपस्थित राहणार आहे. 
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी प्रचंड जनसमुदाय उन्हातान्हाची पर्वा करता इर्वीन चौकात येतो. डॉ. पंजाबराव देशमुख बँकेपासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत महिल पुरुषांसाठी सावलीकरिता भव्य कॅरीडोर तयार केल्या जाणार आहे.
 
पुतळ्याजवळ सर्व अभिवादनासाठी थंड मिनरलचे पाणी ठेवले जाणार आहे. महिला ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र मुतारी, चप्पल बुटे ठेवण्यासाठी रॅक आणि अपंग वृद्धांकरिता प्रवेशद्वारापासून ते पुतळ्यापर्यंत येण्याकरिता व्हीलचेअर आदी सुविधा पुतळा परिसरात करण्यात येणार आहे. याकरीता समितीचे किशाेर बोरकर, जी. व्ही. बागडे, अॅड. पी. एस. खडसे, अनिल भटकर, बापू बेले, प्राचार्य गोपीचंद मेश्राम, प्रा. डॉ. बी. जी. खोब्रागडे, प्रा. डाॅ. सी. बी. मेश्राम, प्रा. डाॅ. संजय खडसे, चरणदास इंगोले, प्रल्हाद रंगारी, प्रा. राजू कोंडे आदी प्रयत्नरत आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...