आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्ताचा एक थेंबही न सांडता बाबासाहेबांनी घडविली क्रांती -प्रा. अशोक गोडघाटे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिप प्रज्वलन करुन प्रज्ञापर्वाचे उद्घाटन करताना माजी मंत्री मनोहर नाईक. - Divya Marathi
दिप प्रज्वलन करुन प्रज्ञापर्वाचे उद्घाटन करताना माजी मंत्री मनोहर नाईक.
पुसद- उच्चवर्णीयांकडून मागासलेल्या लोकांना दिली जात असलेली पशुतुल्य वागणूक हे मागील जन्मातील कर्माचे फळ असून ते निमुटपणे सहन केल्या तरच पुढील जन्मी उच्च जातीत जन्म मिळेल, अशी भावना भारतातील धर्मग्रंथांमधून मागासवर्गीयांच्या मनावर बिंबविण्यात आली होती. त्यावर विश्वास ठेवून करोडोंच्या संख्येने असलेल्या समाजाने ती गुलामगिरी अंगीकारली होती, मान्य केली होती. अशावेळी त्या गुलामीतून बाहेर काढणे कदापीही शक्य नव्हते परंतु अशात बाबासाहेबांनी त्या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून देत परिवर्तन घडविले. रक्ताचा एकही थेंब सांडू देता घडविलेली क्रांती ही जगात झालेल्या क्रांतीपैकी अभूतपूर्व क्रांती ठरली असे मत नागपुरचे प्रा. अशोक गोडघाटे यांनी प्रज्ञापर्वाचे पहिले पुष्प गुंफतांना व्यक्त केले. 
 
स्वातंत्र, समता, बंधुता आणि न्याय ही लोकशाही राष्ट्राच्या जीवनमूल्यांना समाजामध्ये प्रत्यक्ष विकसीत झाली तरच समतावादी समाजरचना भारतीय लोकशाहीत साध्य होऊ शकते, या उदात्त हेतुने प्रज्ञापर्व २०१७ या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे ते १३ एप्रील दरम्यान आयोजन महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, पुसदद्वारा करण्यात आले आहे. या धम्मक्रांती प्रज्ञापर्वाचे उद्घाटन शुक्रवार सायंकाळी वाजता माजी मंत्री तथा आमदार मनोहरराव नाईक यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. आप्पाराव मैंद तर बीज भाषक प्रख्यात आंबेडकरी विचारवंत प्रा. अशोक गोडघाटे नागपूर हे मार्गदर्शक म्हणून तर प्रमुख उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जयवंतराव पाटील कामारकर, अर्जुनराव लोखंडे, लोकहित शिक्षण संस्थेचे अध्यक्ष महेश खडसे, सुतगिरणीचे संचालक राजेश आसेगावकर, सेवानिवृत्त जिल्हाधिकारी फकीरराव वाढवे, पंचायत समितीचे उपसभापती गणेश पागीरे, प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष मिलींद हट्टेकर मंचावर विराजमान होते. 
 
मनोहरराव नाईक यांच्याहस्ते प्रज्ञापर्व २०१७ चे उदघाटन झाल्यानंतर सुजाता महिला मंडळाकडून सामूहिक बुद्धवंदना घेण्यात आली. तसेच ’प्रथम नमो गौतमा’ या गीतावर दि बुध्दीस्ट इंटरनॅशलन स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्यांला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली. प्रबोधन पर्वाच्या आयोजन नियोजनाची भूमिका तसेच मागील वर्षापासून प्रज्ञापर्वातून प्रबोधनासोबतच विधायकतेच्या कामातून रूग्णसेवा विद्यार्थी घडविण्याचे मोलाचे कार्य चालु असल्याचे तसेच यावर्षी १०० विद्यार्थ्यांना आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचालीसाठी उपयुक्त स्वयंरोजगार कार्यक्रमातून भविष्य घडविणार असल्याचा आगामी संकल्प प्रज्ञापर्वाचे अध्यक्ष मिलींद हट्टेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात बोलून दाखविला. 
 
स्वातंत्र पुर्वीपासून सत्तेच्या हस्तांतरण काळापासून भारतात आलेले शिष्टमंडळ. ’भारतीय लोकांनी स्वतःचा कारभार स्वतः चालविण्यासाठी घटना समिती निर्मिती करण्याचे आलेले राजपत्रापासून तर बंगालची निवडणूक, घटना समितीच्या हालचाली बाबत सविस्तर माहिती देत डॉ. बाबासाहेबांनी संविधानाची केलेली निर्मिती पर्यंतचा इतिवृत्तांत सांगीत भारतीय संविधान निर्मिती त्यांचे भव्यदिव्य सर्वांगीण सर्वांना न्याय देणारे संविधानाचे स्वरूप कसे होते आणि त्यासाठी आता आपण जनतेने काय करायला पाहिजे याबाबत आपल्या मार्गदर्शनातून प्रा. अशोक गोडघाटे यांनी प्रज्ञापर्वाचे पहिले पुष्प गुंफले. 
 
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांगीण आणि सर्वांगसुंदर अशा घटनारूपी शिल्पाचे जतन करण्याचे कर्तव्य आपले असल्याचे जाणीव करून देत स्वातंत्र, समता आणि बंधुत्वाचे महत्व आपल्या अध्यक्षीय भाषणातून अॅड. आप्पाराव मैंद यांनी विषद केले. या कार्यक्रमाचे प्रभावी संचालन प्रा. विलास भवरे यांनी तर उपस्थितांचे आभार सुभाष गायकवाड यांनी मानले. यशस्वीतेसाठी प्रज्ञापर्वचे अध्यक्ष मिलींद हट्टेकर, अर्जुनराव लोखंडे, बंडोपंत राउत, साहेबराव गुजर, प्रभाकर गवारगुरू, विठ्ठलराव खडसे, समाधान केवटे, डॉ. पंजाबराव खंदारे, बबन मोगले, भिमराव उंदरे, आशिष काळबांडे, मनोज खिराडे, बाळासाहेब कांबळे, प्रशांत धुळे, ज्ञानेश्वर उबाळे, अशोक वाहुळे, सुरेश कांबळे, रोहन कांबळे, शशांक भरणे, सुभाष गायकवाड प्रज्ञापर्वाचे सर्व सदस्यांनी केले. 
 
शोषित समाजाला मिळवून दिला न्याय 
बाबासाहेबांनी संविधानाच्या निर्मितीला १९४७ च्या महाड सत्याग्रहापासुन सुरूवात केली होती. रक्तदानाशिवाय क्रांती घडविण्याचे त्यांचे कर्तृत्व होते. ज्या देशात, भेदभाव, विषमता आहे तेथे समता पाळता येणार नाही. त्यामुळे तेथे विषमतेने योजना-अधिकार द्यावे लागतील, असे विचार मांडीत समाजाला न्याय मिळवुन देण्याचे कार्य डॉ. आंबेडकरांनी केले. 
बातम्या आणखी आहेत...