आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगराध्यक्षपदासाठी ७३ तर नगरसेवक पदाकरीता १०४७ उमेदवार रिंगणात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकीत अध्यक्षपदाच्या शर्यतीतून आज नाव परत घेण्याच्या शेवटच्या दिवशी २१ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे अध्यक्षपदासाठी नऊ न.प. मध्ये ७३ उमेदवार तर सदस्यपदासाठी रिंगणात असलेल्या ९४ सदस्यांनी माघार घेतल्यामुळे आता १०४७ उमेदवार शर्यतीत आहेत. अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी चांदूर रेल्वे, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, शेंदुरजना घाट, चांदूर बाजार, अचलपूर, दर्यापूर, अंजनगाव सूर्जी येथून एकूण ९४ उमेदवारांनी वैध अर्ज सादर केलेे. त्यापैकी २१ जणांनी नाव परत घेतले आहे तर सदस्य पदासाठी एकूण ११४१ वैध अर्ज आले होते. त्यापैकी ९४ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे आता १०४७ उमेदवार रिंगणात आहेत. चांदुर रेल्वे पालिकेत स्वप्निल मानकर, विनय कड़ू यांनी आपला अध्यक्ष पदाचा अर्ज मागे घेतल्याने अध्यक्ष पदाच्या शर्यतीत उमेदवार राहिले.
धामणगांव रेल्वे
नगराध्यक्ष पदाकरीता तर नगरसेवक पदाकरीता ४४ अर्ज कायम आहे. यात नगराध्यक्ष पदाकरीता प्रताप अडसड, नितीन कनोजीया , आशिष काळबांडे,मारोती सहारे, खान सरफरजा खान अफसर खान हे पाच जण नगरपालिका निवडणूक रिंगणात कायम उरले आहे.

अंजनगांव सुर्जी
नगरसेवक पदाकरीता २० जणांनी उमेदवारी मागे घेतले. कमलाकांत लाडोळे, शालिकराम शिरोळे, कुंदन झाडे,प्राजक्ता येवले,मंजुषा लोळे, म.राजीक, शफिक अहमद, बळीराम धर्मे,जगदीश तायडे, सय्यद मुजीबुर, प्रविण नेमाडे, अजमल खॉ, अ.राजीक अ. रज्जाक हे रिंगणात आहेत.

मोर्शी:
नगराध्यक्षपदाच्या तिन जणांनी उमेदवारी मागे घेतली असून नगरसेवक पदासाठी सहा लोकांनी माघार घेतली आहे. अध्यक्षपदातून नूरजहाँ बक्षी गुलाम, शाह अख्तरबी जाफर,अली आसेफा बानो अली साबिर अली यांनीअर्ज मागे घेतले असून एकूण दहा प्रभागातिल नगरसेवक पदांकरिता १३४ वैध अर्जांपैकी सहा जणानी माघार घेतली.

वरूड, शेंदुरजनाघाट
नगराध्यक्ष पदाकरीता १२ उमेदवार रिंगणात असून उमेदवारांनी माघार घेतली.त्यात स्वाती खासबागे हेमलता कुबडे आहे तर शेंदुरजनाघाट पालिकेत १२ उमेदवार रिंगणात आहे यात कोणीही माघार घेतलेली नाही. तर नगरसेवक पदासाठी वरूडमध्ये १४४ तर शेंदुरजनाघाटमध्ये नगरसेवकापदासाठी ८१ उमेदवार रिंगणात आहे.

दर्यापूर
१२१ उमेदवारांपैकी १२ अपक्षांनी माघार घेतली, नगरसेवकासाठी १०९ रिंगणात आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सुधाकर भारसाकळे, निलीनी भारसाकळे, रविंद्र गणोरकर, प्रदिप मलिये, डॉ. दिनेश म्हाला, (भारिप बहुजन रशीद अ. शकील, मुश्ताक अहेमद जकी अहेमद हे सातही उमेदवार रिंगणात आहेत.

अचलपूर
अचलपूर न.प. निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार रिंगणात आहेत तर ३९ नगरसेवक पदासाठी एकूण २२७ उमेदवार रिंगणात आहेत. कॉग्रेसतर्फे सरबत अंजुम, शिवसेना सुनिता फिस्के, प्रहार लोकभारती दिपाली जवंजाळ, भाजप निलीमा ढेपे, राष्ट्रवादी दिपा नंदवंशी, अपक्ष स्वाती उभाड, अपक्ष वंदना चवरे, आदींचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...