आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियावर मतदाराची पूजा करण्याचे संदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिवसा- आपल्याला समाजासाठी खूप काही करायच आहे. कारण आपण नेहमीच जिंकत आलो. त्याचे कारण म्हणजे नागरिकांनी आपल्याला पुरवलेली रसद आपला प्रामाणिकपणा. यामुळे नागरिक आपल्याला साथ देतात. म्हणून देवाची पूजा नाही केली तरी चालेल मात्र मतदार असलेल्या जनतेची पूजा करायला विसरू नका, अशा प्रकारच्या दक्षतेच्या संदेशांची सध्या सोशल मीडियावर बजबजपुरी झाली आहे. 

निवडणुका आल्या की राजकीय नेते आपल्या प्रचाराचे वेगळेगळे उपाय नेहमीच वापरतात. आपण केलेल्या कामांचे दाखले राजकीय नेते निवडणुकीच्या दिवसांत चांगलेच देतात. गेली कित्येक वर्षे विकासापासून दूर असलेले नागरिक मात्र राजकीय नेत्यांच्या भुलथापांना बळी पडतात पुढील पंचवार्षिक निवडणुक येण्यापर्यंत विकासाचा ओघळ येण्याची वाट पाहतात. त्यामुळे निवडणुकीच्या दिवसात आपले डमरू वाजवण्यात सर्वच राजकीय पक्ष वाकबगार असतात. या निवडणुकीत विविध माध्यमांसोबत सोशल मीडियाही प्रभावी माध्यम बनले आहे. त्यामुळे राजकीय पक्ष, उमेदवारांकडून त्याचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला आहे. 

सध्या तरूणाचा कल हा सर्वाधिक फेसबुक, व्हाट्सअॅपवर असल्याने राजकीय नेतेसुद्धा त्यांचा सर्वाधिक वेळ हा या माध्यमावर खर्च करत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर मतदारांना जयंती, पुण्यतिथी, दिनविशेष, वाढदिवसांच्या भरभरून शुभेच्छा दिल्या जात आहे. ज्या ज्या मतदारांचे मोबाइल क्रमांक नेत्यांच्या मोबाइलमध्ये आहेत. त्यांचे ग्रुप तयार करून त्यांना विविध प्रकारकचे संदेश पाठविले जात आहे. आगामी निवडणुकीत बदल धोरणे, रणनितीचे संदेश याच माध्यमाच्यावतीने पोहचवण्यात येत आहे. तसेच काही खोडसाळ मेसेज किंवा टाकले जात आहेत. निवडणूक आली की छोट्या कार्यकर्त्यांना थातूरमातूर पद देऊन कसे हरभऱ्याच्या झाडावार चढवले जाते, अशा आशयाचेही काही संदेश आहेत. 

संदेशाची जणू जत्राच 
निवडणुकीच्यातोंडावर जात आठवणाऱ्या ‘नेत्यांनो थोडी लाज वाटू द्या. लोकांना जातीची भीती दाखवून निवडणूक लढणे बंद करा. लोकांसाठी काम करा. जनतेचे प्रश्न सोडवून पहा. जनतेला खूप मूर्ख बनवलं आतापर्यंत. आता नाही जातीचा ना धर्माचा...’ असे एक ना अनेक संदेश अनेक राजकीय ग्रुपवर सध्या फिरतानाचे चित्र तालुक्यातील सोशल मीडियावर दिसून येत आहे. 
बातम्या आणखी आहेत...