आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात घरोघरी नाही तर एकाच ठिकाणावरून होणार मीटरचे ‘रिडींग’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मीटर व मधून होणारी वीज चोरी थांबवणे, ग्राहकांना देण्यात येणारे वीज बिल अधिक पारदर्शकपणे जाणे, यासाठी लवकरच महावितरणकडून ‘स्मार्ट ग्रीड’ ही योजना सुरू होणार आहे. स्मार्ट ग्रीड ही योजना अमरावती शहरासाठी मंजूर झाली आहे.
 
या योजनेमुळे प्रत्येकाच्या घरातील वीज मीटरला विशिष्ठ पध्दतीची चीप बसवण्यात येणार आहे. यामुळे शहरातील प्रत्येक वीज ग्राहकाकडे असलेले जुने मीटर काढून नवीन बसवण्यात येणार आहे. 
 
अमरावती शहरात एकूण लाख ४५ हजार वीज ग्राहक आहेत. ‘स्मार्ट ग्रीड’ योजनेमध्ये अमरावतीचा समावेश झाल्यामुळे शहरातील या सर्व वीज ग्राहकांकडे असलेल्या वीजमीटरमध्ये चीप बसवण्यात येईल. ही चीप मीटरमध्ये असल्यामुळे सद्या घरोघरी जाऊन रिडींग घेण्याची गरज उरणार नाही. सद्यास्थितीत महावितरणने नेमलेल्या एजन्सीचे व्यक्ती घरोघरी जाऊन रिडींग घेतात, मीटरचे छायाचित्र काढतात.
 
या पध्दतीमुळे मणुष्यबळ आणि खर्च या दोन्ही बाबी खर्च होतात शिवाय वेळसुध्दा जास्त लागतो मात्र स्मार्ट ग्रीडमध्ये वेळेची मोठ्या प्रमाणात बचत होईल तसेच रिडींग घेण्यामध्ये अचुकता (अॅक्युरसी) वाढणार आहे.
 
रिडींग घेतेवेळी अॅक्युरसी वाढल्यामुळे ग्राहकांना वीजबिल वापर झालेल्या युनिटचेच येईल. सद्या रिडींग घेण्याची ‘मॅन्युअली’ पध्दत असल्यामुळे अनेक वीजबिलात घोळ झाल्याचे प्रकरण पुढे येत असतात. हा प्रकार पुर्णपणे बंद होईल. 
 
वीज मीटरमध्ये चीप बसवण्यात आल्यामुळे मिटरवरून कोणत्याही स्थितीत वीजचोरी होणार नाही, चीप लावल्यानंतर वीजचोरी होत असेल तर ते सुध्दा महावितरणच्या यंत्रणेला नियंत्रण कक्षात माहीती होणार आहे. त्यामुळे आपाओपच वीजचोरी थंाबणार आहे. 

शहरासाठी‘स्मार्ट ग्रीड’ मंजूर: शहरासाठीनुकतीच ‘स्मार्ट ग्रीड’ ही योजना मंजूर झाली आहे. या योजनेमध्ये मीटरला चीप बसवण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वीज ग्राहकांकडे नवीन मीटर बसवण्यात येणार असल्याचे महावितरण कंपनीचे प्रभारी अधीक्षक अभियंता दिलीप मोहोड यांनी सांगितले. शहरात होऊ घातलेल्या स्मार्ट ग्रीड योजनेबाबत नागरिकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. 
 
‘स्मार्ट ग्रीड’चा ग्राहकांना काय होणार फायदा 
शहरातीलवीज ग्राहकांकडे असलेल्या मीटरला नवीन चीप बसवल्यामुळे रिडींग अॅक्युरसी वाढेल, पर्यायाने योग्य बील देईल. काही ठिकाणी अनेकदा घर बंद असल्यानंतर रिडींग घेता येत नाही. त्यामुळे ग्राहकाला सरासरीनूसार बिल दिले जात असल्याची तक्रारी समोर येत आहेत. मात्र मीटरमध्ये नवीन चीप बसवल्यानंतर ही अडचण कायमची दूर होणार असून, ही योजना यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्व ग्राहकांनी सहकार्य करावे,असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. 
बातम्या आणखी आहेत...