आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेरोजगारांसाठी अचलपुरात रोजगार मेळावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- खासगी क्षेत्रात असलेल्या रोजगारांच्या संधीचा शोध घेऊन बेरोजगारांना त्या उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कौशल्य विकास उद्योजकता विभाग अमरावती आणि नगरपरिषद अचलपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याण मंडपम अचलपूर येथे बुधवारी (दि. ८) सकाळी ९.३० वाजता उद्योजक उमेदवार यांचेकरीता रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याकरीता महाराष्ट्रातील नामांकीत कंपन्यांचे प्रतिनिधी, अधिकारी मुलाखत घेण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. 
 
या मेळाव्याकरीता प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान अंतर्गत प्रशिक्षण / रोजगार / उद्योग विषयक मार्गदर्शन करण्यात येईल. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन मुलाखतीव्दारे निवड होण्याच्या दृष्टीने इच्छुक पात्र उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या www.maharojgar.gov.in या संकेतस्थळावरुन ऑनलाईन नोंदणी करावी. सर्व महा-ई सेवा केंद्र, सायबर कॅफे इत्यादी ठिकाणावरुन ऑनलाईन नोंदणी करता येणार आहेत सेच सहभागाची ऑनलाईन नोंद करण्यासाठी काही अडचण असल्यास जिल्हा कार्यालयाच्या दुरध्वनी ०७२१- २५६६०६६ या क्रमांकावर संपर्क करावा.

 
या मेळाव्याच्या माध्यमातून जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात हा उद्देश समोर ठेवून राज्य केंद्र शासनाने तालुकास्तरावर राेजगारविषयक मेळावे आयोजित करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. 
 
मार्चपर्यंत करावी आॅनलाइन नोंदणी 
 नोंदणी करताना मिळालेला स्वत:चा युजर आयडी पासवर्ड वापरुन या मेळाव्याकरीता ऑनलाईन सहभागाची नोंदणी मार्च पर्यंत करावी. ज्या उमेदवारांना तालुका ठिकाणी नोंद करता आली नाही, त्यांना ऑनलाईन नोंद करुन मेळाव्यास उपस्थित राहता येईल. गरजवंत युवक- युवतींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 
 
संपूर्ण कागदपत्र सोबत घेऊन यावे 
मेळाव्यास उपस्थित राहण्याकरीता या कार्यालयाच्या नोंदणी ओळखपत्रासह आणि शैक्षणिक अहर्ततेच्या मूळ प्रमाणपत्र आणि पासपोर्ट फोटोसह इच्छुक पात्र उमेदवारांनी मुलाखातीसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक संचालक कौशल्य विकास रोजगार उद्योजकता अमरावती यांनी केले आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...