आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण घ्या, परीक्षा द्या, मिळवा सात हजार रुपये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- याक्षेत्रात आवड असेल, ते क्षेत्र निवडा. एका महिन्याचे प्रशिक्षण घ्या. परीक्षा उत्तीर्ण करा सात हजार रुपये बक्षीस मिळवा, अशी योजना प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) शहरात सुरू झाली आहे. शहरात सध्या पाच ते सहा सेक्टरमध्ये हे प्रशिक्षण सुरू आहे.
बँकिग, रिटेल, आयटी, कंस्ट्रक्शन, फायनान्स आदी विविध ३० क्षेत्रांचा या योजनेत समावेश आहे. या विविध क्षेत्रांत युवकांना प्रशिक्षण घेता येणार आहे. यासाठी संबंधित युवकाला अधिकृत संस्थेत पहिले नोंदणी करावी लागणार आहे. यामध्ये एका महिन्याचे प्रशिक्षण राहील. प्रशिक्षणानंतर संबंधित युवकाला परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर त्याला सात हजार रुपये बक्षीस स्वरूपात दिले जाईल. याशिवाय नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एमएसडीसी) प्रमाणपत्र दिले जाईल. याचा थेट फायदा युवकाला नोकरीत होईल. ३० सेक्टरमधील कुठल्याही क्षेत्रात जागा निघाली की, या प्रमाणपत्रामुळे युवकाला प्राधान्य दिले जाईल.

दरम्यान, भारतीय तरुण मोठ्या प्रमाणात सक्षम करण्यासाठी तथा विद्यमान काम करणाऱ्या लोकांपैकी उत्पादकता वाढवण्यासाठी या योजनेमुळे युवकांच्या कौशल्यात भर पडणार असून, भविष्यात त्यांना चांगली संधी चालून येणार आहे.

ही आहे पात्रता
-तोदहावी उत्तीर्ण असावा.
-१८ वर्षे पूर्ण केलेला असावा.
-आधार कार्ड असणे गरजेचे.

पीएमकेव्हीवाय योजना काय आहे?
युवकांनाकौशल्य विकासासाठी प्रोत्साहित करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ जुलैला या योजनेचा शुभारंभ केला. ही कुठली शिष्यवृत्ती नसून बक्षीस योजना आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतर परीक्षा उत्तीर्ण केली की, सदर युवकाला सात हजार रुपये संबंधित संस्थेतर्फे देण्यात येणार आहे. युवकांना कौशल्य विकासासाठी प्रोत्साहित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. वर्षभरात देशभरातील २४ लाख युवकांना कौशल्य प्रशिक्षण देण्याचा सरकारचे उद्दिष्ट आहे. १४०० कोटी रुपयांची ही योजना सरकारने खास युवकांसाठी सुरू केली आहे.

प्रत्येक पाच मिनिटांनी नोकरी
शहरातसध्या रिटेल, आयटी, टेलिकॉम बीएफएसआय आदी सेक्टर आहेत. यांपैकी टीम लिझ आयआयजेटी या संस्थेत रिटेलमध्ये ट्रेनी असोसिएट, बीएफएसआयमध्ये म्युच्युएल फंड एजंट, अकाउंट एक्झ्युकेटिव्ह बीसीबीएफ, आयटीमध्ये डाटा एंट्री ऑपरेटर आदी सेक्टर आहेत. दरम्यान, त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. टीम लिझ आयआयजेटी ही मागील दहा वर्षांपासून युवकांना नोकरी मिळवून देण्याचे काम करीत आहे. असे कुलभूषण गावंडे यांनी सांगितले.

परिसरामधील युवकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी
सरकारला२०२२ पर्यंत पाच कोटी युवकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण द्यायचे आहे. याची सध्या सुरुवात झाली आहे. युवकांसाठी ही सुवर्णसंधी असून, त्यांनी त्याचा नक्की लाभ घ्यावा. कौशल्य विकास प्रशिक्षण घेतल्यामुळे युवकांच्या ज्ञानात भर पडणार आहे. भविष्यातील बँकिग, आयटी आदी विविध नोकरीसाठी त्यांना विशेष प्राधान्य दिले जाईल.'' कुलभूषणगावंडे, संचालक टीम लीझ आयआयजेटी.