आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊर्जामंत्र्यांचा अधिकाऱ्यांना ‘करंट’; चिडून म्हणाले, तो तक्रारदार आपला नोकर नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- प्रत्यक्ष रीडिंग घेता ग्राहकांना अव्वाच्या सव्वा दराचे सरासरी वीजबिल पाठविण्याच्या मुद्यावरून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी झालेल्या जनता दरबारात महावितरणच्या अधिकाऱ्यांना जबर ‘करंट’ दिला. रीडिंग घेणाऱ्या एजन्सीसोबत साटेलोट असणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा इशाराही ऊर्जामंत्र्यांनी दिला. या जनता दरबारात जिल्ह्याभरातून आलेल्या शेकडो वीजग्राहकांनी महावितरणच्या ‘डीम’ कारभाराच्या समस्येचा डोंगरच उभा केल्याने अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच ‘गोची’ झाली. 

अनेक ग्राहकांकडून रीडिंग घेतल्यानंतरही सरासरी बिल दिले जातात. यामध्ये ग्राहकांची आर्थिक लूट होत असल्याची बाब ऊर्जामंत्र्यांच्या लक्षात येताच त्यांनी जनता दरबारात सांगितले की, रीडिंग घेणाऱ्या एजन्सीसोबत अनेक अधिकाऱ्यांचे साटेलोट आहे. त्या अधिकाऱ्यांनी हे साटेलोट बंद करून दोषी एजन्सीविरुद्ध फौजदारी दाखल करावी. असे केल्यास दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध आम्ही फौजदारी कारवाई करू, असा इशारा देऊन मुसळधार पावसात अनेक अधिकाऱ्यांना “घाम’ फोडला. याचवेळी अनेक ठिकाणी ग्राहकांनी वारंवार तक्रार देऊनही वाकलेले खांब सरळ झाले नाही. त्यावर ऊर्जामंत्र्यांनी तातडीने उपाययोजनेचे निर्देश दिले. 

जनता दरबारात ग्राहकांनी ज्या समस्या मांडल्या. त्याद्वारे समोर आलेले मुद्दे गंभीर असून यापुढे प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये महिन्याच्या ३० तारखेला ग्राहक मेळावा झाला पाहिजे , असे निर्देशही ऊर्जामंत्र्यांनी दिले. 

‘एचआरए’वेतनवाढ थांबविण्याचे निर्देश; प्रत्येकउपकार्यकारी अभियंत्याचा परिचय करून घेत कोणत्या ठिकाणी राहता, याबाबत त्यांनी विचारणा केली. कारण बहुतांश अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याच्या तक्रारी जनता दरबारात मांडल्या होत्या. त्यामुळे त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत तपासणी करून मुख्यालयी राहणाऱ्या अधिकाऱ्यांचा ‘एचआरए’ थांबवण्याबाबत निर्देश दिले. तसेच भातकुली तालुक्यातील बुधागड, म्हैसपूर, बाेरखडी या गावातील वीजतारा खाली झुकल्या असून व्यवस्थित करण्याबाबत वर्षभरापासून तक्रार केली आहे मात्र अजूनही ते काम पूर्ण झाले नाही. आगामी तीन दिवसात हे काम पूर्ण झाल्यास संबधित अभियंत्याची दोन वर्षाची वेतनवाढ थांबवण्याच्या सूचना यावेळी दिल्या. 

दहाटयांची चौकशी प्रस्तावित
महावितरणमुळेनुकसान झालेल्या ग्राहकांनानुकसान भरपाई देण्यात येते. यासाठी ईलेक्ट्रीकल इनस्पेक्टर कडून अहवाल घ्यावा लागतो, वर्षभरापासून नुकसानभरपाईचे प्रकरण प्रलंबित असल्याची तक्रारी काही ग्राहकांनी केल्या. तसेच संबधित इलेक्ट्रीकल इनस्पेक्टर दहाट यांना पैसे दिल्याशिवाय कामच मार्गी लागत नाही, ते अमरावतीत कमी आणि मुंबईतच जास्त राहतात, असे गंभीर आरोप होत असतानाच ऊर्जामंत्र्यांनी दहाट यांना चांगेलच सुनावले. तसेच तुमची एसीबी चौकशी करायची असेही विचारले आणि त्यांच्या मुंबईस्थित वरिष्ठांसोबत मोबाईलवर चर्चा करून एसीबीकडून दहाट यांची चौकशी प्रस्तावित केली. 
 
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पुजदा येथील अरुण गंगाराम राऊत या शेतमजुराचे दोन्ही पाय महावितरणच्या तारा खाली लोंबल्यामुळे जळाल्याची तक्रार राऊत यांच्या पत्नी मंदा मुलगा पुरूषोत्तम यांनी केली. या गंभीर प्रकरणात महावितरणची चूक असल्याचे मंत्र्यांनी मान्य करून राऊत यांचा उपचाराचा संपुर्ण खर्च महावितरण करणार तसेच कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, शाखा अभियंता लाईनमन या चौघांचीही तातडीने चौकशी दोषी करून आढळणाऱ्यांविरुध्द कठोर कारवाईच्या सूचना दिल्या. एलबीटीवरीलव्याज देण्याबाबत धोरण ठरवणार: अमरावतीतमहापालिकेच्या एलबीटीमुळे तब्बल पंधरा महिने शहरातील वीजग्राहकाकडून बिलाद्वारे एलबीटी वसूल करण्यात आला. 
 

मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एलबीटीची रक्कम परत करण्याबाबत महावितरणला आदेश दिले. त्यामुळे शहरात कोटी ४३ लाखांची रक्कम महावितरण ग्राहकांना जुलै, ऑगस्ट सप्टेंबर महिन्याच्या देयकात समायोजन करून देणार आहे. याचवेळी ज्या पद्धतीने महावितरण ग्राहकाकडून वीज भरण्यासाठी एक दिवस उशीर झाला तर दंड आकारते त्याप्रमाणे या रकमेवरील व्याजही परत करावे अशी मागणी केली. त्यावर धाेरण तयार करण्यात येईल असेही ऊर्जामंत्र्यांनी सांगितले. 
 
चौकशीअंती होणार दोषीविरुद्ध कारवाई 
ऊर्जामंत्र्यांनी दोन ते तीन प्रकरणात संबधित अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. त्यामुळे संबधित प्रकरणांची चौकशी सुरू असून चौकशीअंती कारवाई होणार आहे. भालचंद्रखंडाईत, प्रादेशिक संचालक, महावितरण कंपनी. 
 
ऊर्जामंत्री थेट मार्डीत 
एकीकडे२४ तास नियमीत वीजपुरवठ्याची घोषणा करणाऱ्या यंत्रणेत शहरापासून अवघ्या १६ किलोमीटर अंतरावरील गावात भारनियमन सुरू असल्याची तक्रार मार्डी येथील महिलांनी केली. हे ऐकून मंत्री अवाक झाले. तसेच एखाद्या अधिकाऱ्याने गावाची पाहणी करावी,अशी मागणी केली. ऊर्जामंत्र्यांनी भारनियमन अवघ्या तीन दिवसांत बंद करण्याच्या सूचना देवून स्वत:च तुमच्या गावात येणार असल्याचे सांगितले. शनिवारी रात्री साडेआठ वाजता ऊर्जामंत्र्यांनी मार्डी गाठले होते. 
 
जिल्ह्यात तीन वर्षांमध्ये 250 कोटींची कामे पूर्ण 
२०३० पर्यंत लागणाऱ्या ५० हजार मेगावॅट वीज वापराच्या नियोजनाचा आराखडा राज्य सरकार तयार करीत आहे. मागील वर्षांत जिल्हयातील ३५ उपकेंद्रांच्या कामांना चालना मिळाली असून मार्च २०१८ पर्यंत या उपकेंद्रातून शाश्वत वीज मिळणार आहे. २५० कोटींची कामे गेल्या वर्षांत अमरावती जिल्हयात पूर्ण झाल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. 

आर.ए.पी.डी.आर.पी., पायाभूत आराखडा -२ , दीनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, आदिवासी उपयोजना आदी योजनाअंतर्गत विकासकामे, उपकेंद्राचे भूमिपूजन लोकार्पण विद्युत भवन प्रांगणात शनिवारी ऊर्जामंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री प्रवीण पोटे, जि.प.अध्यक्ष नितीन गोंडाणे, खासदार आनंदराव अडसूळ , आमदार डाॅ. सुनील देशमुख, आमदार वीरेंद्र जगताप , आमदार रमेश बुंदिले , आमदार अॅड. यशोमती ठाकूर, आमदार डाॅ. अनिल बोंडे , दिनेश सूर्यवंशी, जयंत डेहणकर, महापारेषणचे संचालक रवींद्र चव्हाण ,महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता सुहास रंगारी ,भाऊराव राऊत आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

 

जनता दरबार सुरू झाल्यानंतर महावितरणचे अधिकारी ग्राहकांसोबत कसे वर्तन करतात, तक्रारींची कशी दखल घेतात, ही पोलखोल सुरू होती. त्यावेळी साडेतीन तासांच्या जनता दरबारात ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी मुख्य अभियंता सुहास रंगारी यांचा अनेकदा नामोल्लेख केला, तो याप्रकारे.. एका ग्राहकाने तक्रार केली की, आमच्या भागात आता झाडे कापत आहे जे काम उन्हाळ्यात व्हायला पाहिजे, त्यावर मंत्री म्हणाले, रंगारी काय मजाक लावली आहे, थातूरमातूर काम करता काय? त्यानंतर शाखा अभियंता उपकार्यकारी अभिंयता यांनी त्यांच्या स्तरावरील ग्राहक मेळावे योग्य पद्धतीने घेतले नाही असे सांगून रंगारी आम्हाला खोटे रिपोर्टींग होत आहे. जसे आम्ही लोकांसमोर दुकान उघडले (जनता दरबार) तसेच तुम्ही उघडा. मार्डी येथील भारनियमनाचा प्रश्न तीन दिवसांत निकाली निघाल्यास ‘रंगारी मला मोठा निर्णय घ्यावा लागेल’. तसेच दहाट प्रकरणी मंत्री म्हणाले, रंगारी हे दुरूस्त करा. तसेच एका ग्राहकाने मीटर संदर्भात तक्रार केली. त्यावर मुख्य अभियंत्याने तक्रारदारालाच यादी मागितली, त्यावर मंत्री चिडून रंगारी यांना म्हणाले तो तक्रारदार आपला नोकर नाही. 
बातम्या आणखी आहेत...