आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपाळमधील बोगस कॉल सेंटरवर छापा; 20 युवतींसह 28 जण ताब्यात, नागपूर पोलिसांची कारवाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नागपूर - नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांना फसवणाऱ्या मध्य प्रदेशातील भोपाळ येथील ‘शाइन नोकरी डॉट कॉम’ या कॉल सेंटरवर नागपूर शहर पोलिसांच्या सायबर सेलने छापा घालून या रॅकेटच्या सूत्रधार व त्याच्या साथीदारास अटक केली.  
 
अलीकडेच चंद्रपूर जिल्ह्यातील बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात सायबर सेलला यश आले होते. त्यानंतर नागपुरातील सतीश बांते याने एक लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार सायबर सेलकडे दिली होती. शाइन नोकरी डॉट कॉम या वेबसाइटवर त्याने नोंदणी केली होती. कॉल सेंटरवरून त्याला एक लाखाची रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते. पैसे जमा करूनही त्याला नोकरीचा कॉल आला नव्हता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्याने तक्रार दिली होती. या रॅकेटचे धागेदोरे मध्य प्रदेशात असल्याचे तपासात स्पष्ट झाल्यावर सायबर सेलच्या पथकाने भोपाळमधील एमपीनगर येथील या कॉल सेंटरवर छापा घातला. या कारवाईत २० युवतींसह एकूण २८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केल्याची माहिती सायबर सेलच्या पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.  
या कॉल सेंटरचे सूत्रधार असलेले धर्मेंद्र राठौर (रा. मुरैना) आणि प्रियेश तिवारी (नोएडा) या दोघांना अटक केल्याचे सांगण्यात आले. मागील दोन दिवसांपासून सायबर सेलचे ८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक भोपाळमधील एमपीनगर येथे डेरेदाखल होते. भोपाळ पोलिसांच्या मदतीने या पथकाने कॉल सेंटरवर छापा घालून ही कारवाई केली. कॉल सेंटरच्या रॅकेटमधील भामटे ८० ते ८५ सिमकार्डच्या माध्यमातून बेरोजगाराशी संपर्क साधायचे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सिमकार्ड््स, लॅपटॉप, संगणक जप्त केले. कॉल सेंटरच्या माध्यमातून देश-विदेशात नोकऱ्या मिळवून देण्याच्या नावावर बेरोजगारांची फसवणूक केली जात होत होती. 
बातम्या आणखी आहेत...