आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीमध्ये पित्याची हत्या; मृतदेह नेला सहा किमीपर्यंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - प्रॉपर्टीच्या वादातून मुलानेच आपल्या पित्याचा दोरीने गळा आवळून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सहा किमीपर्यत मृतदेह दुचाकीवर वाहून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मृतक नामदेव साधुजी कांबळे (७० रा. कोठा फत्तेपूर जि. वर्धा)यांचा धाकटा मुलगा शाहुराज कांबळे याला एलसीबी तळेगाव दशासर पाोलिसांनी अटक केली आहे. 
 
नागपूर औरंगाबाद महामार्गावरील पिपंळखुटा गावापासून काही अंतरावर एका वृध्दाचा मृतदेह तळेगाव दशासर पोलिसांना बुधवारी मध्यरात्री आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेवून पाहणी केली असता गळ्यावर व्रण दिसले. मात्र मृतकाची ओळख पटली नव्हती. त्याचवेळी मृतकाच्या खिशातून पोलिसांना सात बारा मिळाला आहे. या सात बाराच्या आधारे पोलिसांनी कोठा फत्तेपूर गाव गाठले. तसेच कांबळे यांच्या कुटूंबियांना छायाचित्र दाखवले तर त्यांनी ते छायाचित्र नामदेव कांबळे यांचेच असल्याचे सांगितल्यामुळे ओळख पटली. मात्र नामदेव कांबळे यांना मारले कोणी, हा प्रश्न पेालिसांपुढे होता. दरम्यान माहितीच्या आधारे पोलिसांनी नामदेव कांबळे यांच्या शाहुराज नामक मुलाला ताब्यात घेतले. त्याने गळा आवळून खून केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे. ही कारवाई अप्पर पोलिस अधीक्षक एम. एम. मकानदार, उपविभागीय अधिकारी अविनाश पालवे, एलसीबीचे पीआय अनिल लाड यांच्या मार्गदशर्नाखाली तळेगावचे ठाणेदार निलेश सुरडकर तसेच एलसीबीचे एपीआय नागेश चतरकर, अरुण मेटे, मुलचंद भांबुरकर, शकिल चव्हाण, युवराज मानमोटे, बंडू देऊळकर, संजू भोपळे, पंकज वाठ आणि अविनाश राठोड यांनी केली आहे.नामदेव कांबळे यांना पत्नी, धनराज शाहुराज असे दोन मुल आहेत. मात्र धनराज शाहुराज हे दोघेही मजूरीसाठी आर्वी तालुक्यातील बोरगाव येथे राहत आहे. नामदेव कांबळे यांच्याकडे पाच एकर शेत आहे ते अजूनपर्यंत मुलांच्या नावे करून देण्यात आले नव्हते. वडील हे शेतही विकून टाकतील, आपले कसे होईल. त्यामुळे यातूनच यापुर्वी त्या बापलेकांचा वाद झालेला असल्याचे पोलिसांच्या तपासात आले आहे. 

बुधवारी रात्री शाहूराज बोरगावरून कोठा फत्तेपूर येथे आला. येताना सोबतच नायलॉनची दोरी आणली. याच दोरीने त्याने वडिलांचा गळा आवळला. त्यानंतर जखम झाल्यामुळे घरात रक्त पडले होते, ती जागा त्याने पाण्याने धूऊन घेतली. त्यानंतर वडिलांचा मृतदेह दुचाकीवर बांधून घेतला मध्यरात्रीच तब्बल सहा किलोमीटर विल्हेवाट लावण्याच्या दृष्टीने महामार्गालगत आणून टाकला. जेणेकरून अपघाताने हा मृत्यू झाला असे त्याला भासवायचे होते. मात्र पोलिसांनी अवघ्या सहा तासात शाहुराजचे बिंग फोडले आणि त्याला अटक केली. या प्रकरणी शहूराजच्या पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
बातम्या आणखी आहेत...