आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नरेंद्र मोदी सरकार जनतेला हुकूमशाहसारखी वागणूक देते, माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांनी केला आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आर्णी - लोकसभा,विधानसभा निवडणुकीत दिलेले आश्वासन पाळता मोदी सरकार नोटबंदी करून देशातील जनतेला एक प्रकारे हुकूमशाहसारखी वागणूक देत असल्याची टिका माजीमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी केले. आज, दि. १३ डिसेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
यावेळी माजी मंत्री प्रा. वसंत पुरके यांच्यासह काँग्रेसचे नेते उपस्थित होते. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने तहसील पुढे विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे बोलत होते.
यावेळ माजीमंत्री शिवाजीराव मोघे बोलताना पुढे म्हणाले की, सरकारने नोट बंदीबाबत देशातील मोठे उद्योगपती व्यापाऱ्यांना आधीच माहिती दिली होते. त्यामुळे उद्योगपती किंवा मोठे व्यापारी हे एटीएमच्या रांगेत दिसले नाही. सामान्य माणूस मात्र रागेंत उभे राहून पैसे काढत असताना शंभर पेक्षा जास्त नागरिक मरण पावले हेच का अच्छे दिन, असा संतप्त सवाल माजीमंत्री शिवाजीराव मोघे यांनी उपस्थित केला.

भाजप सरकार हे मराठा-मुस्लिम आरक्षण विरोधी असून, ते कधीही मराठा किंवा मुस्लिम समाजाला आरक्षण देणार नसल्याची टिका मोघे यांनी केली. देशाचे पंतप्रधान हुकुमशाह सारखे वागत असल्याने खरच सामान्य जनतेला ‘अच्छे दिन’ येइल का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. भाजप सरकारचे डोळे उघडण्यासाठी होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजप विरोधात मतदारांनी मतदान करून सरकारला धडा शिकवला पाहिजे असे आवाहन माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी स्थानिक आमदार, खासदारांना लक्ष करत त्यांच्यावर जोरदार टिका केली. तालुक्यातील शेतकऱ्यांना २४ तास वीज पुरवठा व्हावा, यासाठी आपण मोठ्या मेहनतीने जवळा येथे १३२ केव्ही उपकेंद्र मंजूर करून आणला होता. आजघडीला त्या उपकेंद्राचे काम पूर्ण झाले असताना फक्त श्रेय घेण्यासाठी उपकेंद्र सुरू करण्यात येत नसल्याचे मोघे यांनी सांगितले.
आर्णी तालुक्यातील निराधार लाभार्थी बदल दोन वर्षांत एकही बैठक आमदार राजू तोडसाम यांनी घेतल्याने हजारो लाभार्थीना योजनेपासून वंचीत रहावे लागत आहे. जनतेचे लोकप्रतिनिधी झोपेत का आहे. अशी टिका शिवाजीराव मोघे यांनी यावेळी केली. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेस कडून एकदिवशीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले. यावेळी तहसीलदार सुधीर पवार यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

यावेळी माजी मंत्री शिवाजीराव मोघे, साजीद बेग, माजी नगराध्यक्ष अनिल आडे, जितेंद्र मोघे, अनंता गावंडे, बाळासाहेब शिंदे, डॉ. रामचरण चव्हाण, तालुकाध्यक्ष सुनिल भारती, नगरसेवक आरीज बेग, नगरसेवक राजू विरखेडे, मनिष पाटील, सभापती सुनिता राठोड, जिल्हा परिषद सदस्या मिनाक्षी राऊत, उपसभापती लता डोल्हारकर, तालुका उपाध्यक्ष नितेश पाटील बुटले, नरेश राठोड, जिल्हा परिषद सदस्य सोनबा मंगाम यांच्यासह हजारो काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...