आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाेसरी भूखंड प्रकरण: एकनाथ खडसेंची सुनावणी संपली; आता अहवालाची प्रतीक्षा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘भाेसरी भूखंड गैरव्यवहाराची चाैकशी करत असलेल्या न्या. दिनकर झोटिंग आयोगाला फौजदारी कारवाईची कुठलीही शिफारस करता येणार नाही,’ असा दावा माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या वकिलांनी सुनावणीच्या अखेरच्या दिवशी बुधवारी आयोगापुढे केला. भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणात खडसे यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग आयोगाची सुनावणी बुधवारी पूर्ण झाली असून आता याप्रकरणी आयोग राज्य शासनाला लवकरच अहवाल सादर करणार आहे.   

खडसे यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. एम. जी. भांगडे यांनी बुधवारी एमआयडीसीकडून मंगळवारी पार पडलेल्या युक्तिवादाला लेखी उत्तर दिले. न्या. झोटिंग आयोगाला फौजदारी कारवाईची कुठलीही शिफारस करता येणार नाही, असा दावा खडसे यांच्या वकिलांनी आयोगापुढे केला. त्याचप्रमाणे भारतीय पुरावा कायदा आयोगाला लागू असल्याचा दावाही खडसे यांच्या वतीने करण्यात आला. खडसे यांच्या वतीने त्यांच्या पत्नीची साक्ष येणे गरजेचे होते, या एमआयडीसीकडून झालेल्या युक्तिवादावर खडसेंच्या वकिलांनी त्याची गरज नव्हती, असे स्पष्ट केले.  खडसे यांच्या पत्नीची साक्ष का आवश्यक होती हे एमआयडीसीकडून स्पष्ट करण्यात आले नव्हते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. 
 
दरम्यान, न्या. झोटिंग आयोगाने सुनावणीचे कामकाज पूर्ण झाल्याचे नमूद करून लवकरच राज्य शासनाला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.    
 
चाैथ्यांदा मुदतवाढ देण्यास सरकारचा नकार
भाेसरी एमअायडीसीतील सुमारे तीन एकरच्या भूखंड खरेदीत गैरव्यवहाराचा ठपका खडसेंवर ठेवण्यात अाला हाेता. यातूनच त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. खडसेंवरील आरोपांवर राज्य शासनाने २३ जून २०१६ रोजी न्या. झोटिंग आयोग स्थापन केला होता. या आयोगाने सहा महिन्यांत अहवाल देणे अपेक्षित असताना आयोगाचे कामकाज सातत्याने रेंगाळले. ३१ मार्चला आयोगाची तिसरी मुदतवाढ संपुष्टात आल्यावर राज्य शासनाकडून चौथी मुदतवाढ मिळू शकली नाही. एमआयडीसीच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. चंद्रशेखर जलतारे यांनी काम पाहिले.
 
हे पण वाचा, 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...