आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ जिल्ह्यामध्ये 48 तासांमध्ये चार खून, पोलिस प्रशासनही हादरले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
यवतमाळ - मागील ४८ तासांत जिल्ह्यात एक दोन नव्हे, तर तब्बल खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. या चारही प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. असे असले तरी मुळात गुरुवारी रात्रीपासून ते शनिवारी सकाळपर्यंतच्या काही तासांच्या कालावधीत क्षुल्लक वादातून खुनासारख्या चार-चार घटना घडल्याने आता गुन्हेगारी वर्तुळा पाठोपाठ सर्वसामान्यांमध्येही पोलिसांचा धाक उरला नसल्याचे दिसत आहे. 
 
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका, त्यांचे निकाल आणि त्यापाठोपाठ आलेली महाशिवरात्री या सगळ्यांच्या बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिस दलाला उसंत मिळते मिळते तोच गुरुवारी रात्रीपासून जिल्ह्यात खुनाच्या घटना उघडकीस येण्याचे सत्र सुरू झाले. त्यात शनिवारी सकाळपर्यंत तब्बल खुनाच्या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनांची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने तातडीने कारवाई करत या चारही प्रकरणातील प्रमुख आरोपींना गजाआड केले. मात्र एकाच दिवशी घडलेल्या या चार खुनाच्या घटनांमुळे पोलिस प्रशासनही हादरले होते. 
 
जुन्यावादातून घाटंजीमध्ये एका जणाचा खून 
सहामहिन्यांपूर्वी एका क्षुल्लक वादातून केलेल्या मारहाणीचा वचपा काढण्यासाठी एका तरुणाला लोखंडी रॉडने मारून ठार केल्याची घटना घाटंजी येथील प्रोफेसर कॉलनी परिसरात शुक्रवारी रात्री १० वाजता घडली. अक्षय भोरे रा. जगदंबा नगर असे मृतकाचे नाव आहे. सहा महिन्यांपूर्वी १३ ऑगस्ट २०१६ ला अक्षय भोरे याचा आणि आरोपींचा गाडीला कट लागल्याच्या कारणावरून वाद झाला होता. त्यात अक्षयने बक्सा मस्कर याला मारहाण केली होती. त्यावेळी घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अक्षय भोरे याच्याविरुद्ध मारहाणीचा गुन्हाही दाखल केला होता. त्यानंतर अक्षय भोरे हा एका कंपनीत काम करण्यासाठी बाहेरगावी निघून गेला. 
 
दरम्यान, गेल्या चार दिवसांपूर्वी अक्षय भोरे काही कामानिमित्त घाटंजी येथे आला होता. तेव्हापासून आकाश उर्फ बोका संतोष मस्कर वय २६, अक्षय उर्फ बक्सा संतोष मस्कर वय २२ आणि चेतन सुखदेव टेकाम वय ३७ सर्व रा. घाटंजी यांनी संगनमत करून अक्षयला गाठण्याचे प्रयत्न केले. त्यात शुक्रवारी रात्री १० वाजता अक्षय घरी जात असताना या तीनही जणांनी त्याला दुचाकीवरून खाली पाडले. त्यानंतर त्याच्या डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण करून त्या ठिकाणावरून पळ काढला. ही बाब लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी अक्षय याला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गणेश भावसार यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यानंतर तातडीने तपासाची सुत्रे फिरवून तिन्ही आरोपींना अटक केली. 
 
महागावतालुक्यामध्ये बापाने केला मुलाचा खून 
जन्मदात्यानेच आपल्या चार वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना महागाव पोलिस ठाणे हद्दीतील सातघरी येथे उघडकीस आली. शुक्रवारी या घटनेमागील सत्यता उघडकीस आल्यानंतर काही काळासाठी पोलिसही सुन्न झाले. धीरज किशोर जाधव असे मृतक चिमुकल्याचे नाव आहे. 
 
सातघरी येथील जाधव यांच्या घरात गुरुवारी दुपारच्या सुमारास धीरजचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली. त्यानंतर धीरजचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला. या प्रकरणी महागाव पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली. दरम्यान, शुक्रवारी वैद्यकीय अहवाल पोलिसांच्या हाती आला. त्यामध्ये धीरजचा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे उघडकीस आले. त्यानंतर पोलिसांनी तपासाची सुत्रे वेगाने फिरवली. त्यात पोलिसांच्या हाती आलेल्या माहितीनुसार धीरजचा बाप किशोर गोविंदा जाधव वय ३० आणि त्याची आई यांच्यात सातत्याने वाद होत होता. किशोर हा त्याच्या पत्नीपासून वेगळा होण्याच्या प्रयत्नात होता. त्यासाठी तो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला मारहाण करायचा. त्यातच त्याने धीरजचा गळा आवळून खून केला. त्याच्या पत्नीकडून ही माहिती मिळताच पोलिसांनी किशोरला ताब्यात घेतले. तसेच तक्रारीवरून किशोरविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
पांढरकवड्यात एका युवकाचा खून 
एका२३ वर्षीय युवकाचा तीन ते चार जणांनी मिळून लोखंडी रॉडने खून केला. ही थरारक घटना उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी सायंकाळी वाजता दरम्यान घडली. रस्त्याने जात असलेल्या सोनू आणि पंकज मडकाम (मरगड) वय २३ रा. राम मंदिर परिसर या युवकास उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालयाच्या समोरील रस्त्यावर किरकोळ वादातून तीन ते चार जणांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात पंकजसोबत असलेला सोनू नामक युवक तेथून पळून गेला. मात्र, आरोपीच्या तावडीत सापडलेल्या पंकज मडकाम यास डोक्यावर लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जिवानिशी ठार करण्यात आले. 
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच ठाणेदार गुलाबराव वाघ यांनी त्यांच्या पथकासह घटनास्थळ गाठून पंचनामा केला. तसेच सर्वत्र नाकाबंदी केली. यामध्ये पोलिस उपनिरीक्षक संजीव खंडारे यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वरील तालुक्यातील कोंघारा येथील पेट्रोल पंपाजवळून शेखर देशट्टीवार, कुणाल भगत मिथून उईके या तीन संशयितांना ताब्यात घेतले. या प्रकरणात या तिन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
 
दारव्हातालुक्यामध्ये धारदार शस्त्राने खून 
धारदारकोयत्याने वार करून एका २३ वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना दारव्हा तालुक्यातील रामगाव ( हरू ) येथे गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. विजय भीमराव चव्हाण वय २३ वर्ष असे मृतक तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी विजय गोबरसिंग पवार वय ५० वर्ष याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. विजय चव्हाण हा त्याच गावातील विजय पवार याच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहत होता. याच कारणावरून विजय पवारने विजय चव्हाणच्या मानेवर कोयत्याने वार करून खून केला. या घटनेची माहिती मिळताच दारव्हा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन विजय गोबरसिंग पवार याला ताब्यात घेऊन त्याच्याजवळील कोयता जप्त केला. पोलिसांनी विजय पवार याची कसून चौकशी केली असता, स्वत: खून केल्याची कबुली त्याने दिली. 
 
पुढील स्लाईडवर वाचा, मृतदेह आढळला, एकास भोसकले... 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...