आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना रुपये किलो धान्याऐवजी रोख अनुदान द्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यातपाऊस आल्यामुळे अनेक भागातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आलेला आहे. शेतकऱ्यांचा आत्महत्या होवू नयेत म्हणून शासनाने अन्नधान्य योजना आणली आहे. परंतु ही योजना अत्यंत चुकीची आहे. असा आरोप करून शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतीमालाला योग्य भाव द्यावा तसेच ही मदत अन्न धान्य कमी दरात देता शेतकऱ्यांना अनुदान रोख स्वरुपात तातडीने द्या, या मागणीसह अन्य मागण्यासांठी आमदार बच्चू कडू कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. १७) जिल्हा कचेरीवर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले.
विदर्भासह राज्यातील अनेक भागात पेरणी झाल्यानंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे अनेक भागात शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. पूर्वीच ताेट्यात असलेल्या शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्या वाढू लागल्या होत्या. आत्महत्या वाढू नये, शेतकऱ्यांना मदत व्हावी, हा उद्देश पुढे ठेवून शासनाने शेतकऱ्यांना दोन रुपये दराने धान्य देण्याचा निर्णय घेतला. मात्र यामध्ये सर्व घटकांचा विचार झालेला नाही, असे आमदार बच्चू कडू म्हणाले.
या योजनेमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील व्यक्ती, भूमिहीन, शेतमजूर, विधवा, अपंग यांचा समावेश करणे आवश्यक आहे. कोरडवाहू शेतातील पेरणी ते कापणी पर्यंतचे कामे महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत व्हायला पाहिजे, या पध्दतीने काम झाल्यास शेतकरी शेतमजूर यांना खऱ्या अर्थाने फायदा होणार असल्याचे आमदार कडू यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे. यावेळी छोटू महाराज वसू, धीरज जयस्वाल, जोगेन्द्र मोहोड, प्रविण हेंडवे, प्रविण मुंधडा, बाळासाहेब वाकोडे, मंगेश देशमुख, पिंटू टापरे, गजू भुगूल, रणजित ,खाडे, सावधान वानखडे, रविन्द्र वैद्य, चंदू खेडकर, भारत उगले, प्रभाकर वानखडे , अज्जू पठाण यांच्यासह अनेक शेतकरी प्रहारचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. पोलिसांनी सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने चारही बाजूने बंदोबस्त लावला होता. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षासमोर बॅरीगेट्स लावून अधिक सुरक्षा या भागात ठेवण्यात आली होती. जवळपास दुपारी वाजताच्या सुमारास निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर, अमरावतीचे तहसीलदार सुरेश बगळे यांनी आमदार कडू यांच्या उपोषण मंडपात येऊन निवेदन स्वीकारले शासनापर्यंत पोहचवण्याचे आश्वासन दिले.
हमीभावाबाबत शेतकऱ्यांची थट्टा
शेतमालाचेभाव ५० टक्के नफा गृहीत धरून काढण्याचे आश्वासन वचननाम्यात दिले होते. परंतू त्याची पूर्तता कधी करणार, याबाबत शासनाकडून कुठेही अभिप्राय आलेला नाही. उलट कपाशीचे भाव हजार ७५० रुपये प्रतिक्विंटल वरून हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल जाहीर केले. यावरून केवळ ५० रुपये दरवाढ प्रतिक्विंटल झाली आहे. ही वाढ म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे. अशाच पध्दतीने सोयाबिनमध्ये ४० रुपये प्रतिक्विंटल, गहू ५० रुपये, हरभरा ७५ रुपये, तूर २७५ रुपये अशा पध्दतीने वाढ दिलेली आहे. वास्तविकता या भावामुळे शेतकऱ्यांची मुद्दल सुध्दा निघत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची लुट थांबविण्यात यावी, अशी मागणी आमदार कडू यांनी केली. जे काम काँग्रेस सरकारने केले तेच आता भाजप सरकार करत असल्याचा आरोपही यावेळी आमदार कडू यांनी केला.
२९ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या गावात जाऊन राख्या बांधणार
शेतकऱ्यांनाखऱ्या अर्थाने मदत व्हावी म्हणून शेतीमालाला योग्य भाव द्यावा, अन्न धान्य सुरक्षा योजनेमध्ये विधवा अन्य घटकांना धान्य द्यावे, याच मागण्यांसाठी आम्ही शेकडो विधवांना सोबत घेऊन २९ ऑगस्टला मुख्यमंत्र्यांच्या गावी जाणार आहे. यावेळी विधवा महिला मुख्यमंत्र्यांना राख्या बांधून आपल्या भावाकडून वरील मागण्यांच्या पुर्ततेची मागणी करणार आहे.'' बच्चूकडू, आमदार.