आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुण्याच्या जुळ्या बंधूंनी घेतला संगणक साक्षरतेचा वसा, ग्रामीण विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - पुणे येथे स्थायिक झालेल्या जुळ्या भावांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा वसा उचलला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण देत ‘प्रोजेक्ट उषा’च्या माध्यमातून आत्मनिर्भर करण्याचे कार्य हर्षल हिमांशू देशमुख मागील नऊ महिन्यांपासून करीत आहे. जिल्ह्याच्या भातकुली तालुक्यातील खोलापूरच नाही तर राज्यातील दहा ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी मोफत संगणक प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले. 
 
भातकुली तालुक्यातील खोलापूर येथील मूळ रहिवासी असलेले हर्षल हिमांशू देशमुख हे पुण्यात स्थायिक झाले आहे. पुणे येथील सूर्यदत्त काॅलेजमध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षण घेत असताना ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना देखील संगणक साक्षर करण्याचे कार्य करीत आहे.
 
ग्रामीण भागातील विद्यार्थी संगणक परिचीत होऊन स्वयंरोजगार तसेच आत्मनिर्भर व्हावेत, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन या जुळ्या भावांनी मोफत संगणक प्रशिक्षण देण्याचे कार्य आरंभ केले आहे. राज्याच्या विविध भागात त्यांच्याकडून देण्यात आलेल्या मोफत संगणक प्रशिक्षणाचा फायदा तब्बल १५०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना झाला आहे. मागील महिन्यात संगणक साक्षर झालेल्या विद्यार्थ्यांना खोलापूर येथे प्रशस्तीपत्र देण्यात आले.मोफत संगणक प्रशिक्षण देणाऱ्या या प्रकल्पाची मदत घेत सहकार्य करणार असल्याचे येथील शिक्षकांनी प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रमात सांगितले. प्रशस्तीपत्र वितरण कार्यक्रमाला दादासाहेब देशमुख, पीएसआय सतीश चवरे, खोलापूरचे सरपंच आशुतोष देशमुख, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश कृष्णराव देशमुख, भातकुली पं.स. उपसभापती कल्पना चक्रे यांची उपस्थिती होती. 
 
युनिसेफकडून दखल 
हर्षल हिमांशू देशमुख यांनी गत महिन्यांपासून सुरू केलेल्या ‘प्रोजेक्ट उषा’ या मोफत संगणक प्रशिक्षण कार्यक्रमाची दखल युनिसेफने घेतली आहे. युनिसेफच्या भारतातील प्रमुख डॉ. राजी नायर यांच्याकडून देखील पुण्यातील या जुळ्या भावांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...